अमळनेर:कोरोना सारख्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करणारे पोलीस कर्मचारी व जीव धोक्यात घालून वृत्तसंकलन करणारे पत्रकार यांची "कोरोना टेस्ट"घेतली जाणार आहे.
ही वैद्यकीय टेस्ट अमळनेरचे साई सेवा हॉस्पिटलचे डॉ प्रशांत शिंदे यांच्याकडून आज 5 पोलीस अधिकारी व 65 पोलीस कर्मचाऱ्यांची आज केली गेली तसेच उद्या सायंकाळी पत्रकारांची वैद्यकीय चाचणी होणार आहे..डॉ प्रशांत शिंदे यांचा गौरव पी आय अंबादास मोरे व गोपनीय शाखेचे शरद पाटील यांनी केला आहे.
तसेच मेडिकल शिबिराचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी स पो नि एकनाथ ढोबळे,स पो नि प्रकाश सदगीर,पी एस आय राजेंद्र माळी व गणेश सूर्यवंशी,दीपक माळी, रवींद्र पाटील,हितेश चिंचोरे,योगेश महाजन व हजेरी मास्तर संजय पाटील हे परिश्रम घेत आहेत.