शिंदखेडा
रजाणे:रविंद्र शिरसाठ:-
प्रदिप दादा पाटील युवा मंच रंजाणे व राधाई फाऊंडेशन मार्फत रंजाण्यात मास्क व ग्लोज वाटप..रंजाणे ता.शिंदखेडा जि धुळे येथे ग्रामीण भागात कोरोना सर्वेक्षण काम व तसेच धान्य वाटप कोरोना जनजागृती काम अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स करत असतात. काम करत असताना त्यांना पुरेशी संरक्षण कीट म्हणून मास्क व ग्लोज चे वाटप करण्यात आले तसेच डाॅ.बिपिन सोनवणे व त्यांची टिमचे व आरोग्य सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, यांचा फुल गुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला, तसेच या वेळी रंजाणे तील ग्रामस्थांना ही मास्क चे वाटप करण्यात आले ..या वेळी प्रा.डाॅ. बिपिन सोनवणे वैद्यकीय आधिकारी धमाणे, डाॅ.दिलीप गवळी,आ.सहाय्यक, श्रीमती सुषमा निकम आरोग्य सेविका रंजाणे,श्री.डी.जे.वसावे,आरोग्य सेवक, श्री.संजय पाटील वाहन चालक,श्री अनिल ठाकुर आरोग्य सेवक, श्री.हेमराज गोसावी, तसेच रंजाणे तील सरपंच शोभाबाई ठाकरे, माजी सरपंच महेंद्र गिरासे, धर्मराज पाटील (पमा आण्णा) श्री. विजय शिरसाठ, जेष्ठ नागरीक बाबूराव ईशी, पोलीस पाटील सुनिल मोरे, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र वाडीले , आदि उपस्थित होते.