अमळनेर-शहरात कोरोना वाढता प्रादुर्भाव असताना माजी आ कृषीभूषण साहेबराव पाटील व मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली  पालिकेची संपुर्ण टीम आपला जीव धोक्यात घालून शहरवासीयांच्या बचावासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्याने प्रभाग क्र 9 मधील न्यू प्लॉट भागात या संपूर्ण टीमचे कामगार दिनानिमित्त फुलांचा वर्षाव करून स्वागत आणि विशेष सत्कार करण्यात आला.
            श्री राजेशहाजी मित्र मंडळ,शनी मंदिर गल्ली यांच्या वतीने  आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सहयोगाने सोशल डिस्टनसिंग ठेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी सर्व सफाई कामगारांना पोहे व शिऱ्याचा नास्ता आणि डॉ शरद बाविस्कर यांच्या वतीने मास्क व पालिकेच्या वतीने सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.तर पालिकेचे नेतृत्व करीत असताना कोरोना सदृश्य परिस्थितीत शहराचे पालकत्व स्वीकारल्यागत उत्तम कार्य करणारे आणि उपयोजनेच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेणारे माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा विशेष सत्कार याप्रसंगी संपूर्ण प्रभागाच्या वतीने करण्यात आला.तर काही दिवसांपूर्वीच अमळनेर पालिकेत मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळली असताना आपल्या कार्यशैलीने आपत्कालीन परिस्थिती उत्कृष्टपणे हाताळणाऱ्या व पोटच्या लहान चिमुकल्यास मूळगावी ठेऊन कर्तव्य बजावणाऱ्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांचाही विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.याव्यतिरिक्त प्रभागाचे नगरसेवक निशांत अग्रवाल,  उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी,आरोग्य निरीक्षक वाय एस चव्हाण,संतोष बिऱ्हाडे,अरविंद कदम,कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी सोमचंद संदानशिव,प्रभागाचे मुकादम ज्ञानेश्वर संदानशिव,शाम महाजन,अतिक्रमण विभागाचे राधेश्याम अग्रवाल आदी सर्वांचा देखील सत्कार केल्यानंतर सर्व कामगारांना मास्क व सॅनिटायझर देऊन सन्मानित करण्यात आले.
      कृषिभूषण पाटलांसह मुख्याधिकारी व कर्मचारी व कामगारांचे सोशल डिस्टनसिंग ने प्रभागात आगमन होताच सर्व रहिवाश्यांनी आपल्या घराच्या दरवाजातून या सर्वाचे टाळ्या वाजवून स्वागत केले तर दोडे गुजर भुवन येथे कार्यक्रम स्थळी पोहोचताच सर्वांवर फुलांचा प्रचंड वर्षाव करण्यात आला,यावेळी सर्व कामगारांना सोशल डिस्टनसिंग नुसार चौकोन आखून बसविण्यात आल्याने कृषिभूषण पाटील यांनी आयोजकांच्या नियोजनाचे तोंडभरून कौतुक करून पालिकेचे पदाधिकारी,अधिकारी व कामगारांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढविल्याने आयोजकांचे आभार मानले तर मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक करून कामगारांना व प्रभाग वासीयांनी योग्य ते मार्गदर्शन केले.सुरवातीला प्रास्तविकात राजेशहाजी मंडळाचे अध्यक्ष तथा अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी कृषिभूषण पाटील हे शहराचे पालकत्व स्वीकारल्यागत काम करीत असून त्यांच्यासह मुख्याधिकार्यांच्या नेतृत्वात पालिकेची संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेत असल्यानेच अमळनेरकर सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत या टीम सह आरोग्य सेवेतील डॉक्टर्स व कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे प्रभागाच्या वतीने आभार मानले तर प्रभागातील जेष्ठ नागरिक ओस्तवाल जैन समाजाचे अध्यक्ष प्रकाशचंद पारख यांनीही मनोगतातून संपूर्ण टीम चे कौतुक केले.यावेळी,काँगेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, भारतीय जैन संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद जैन,दैनिक जनवास्तव चे कार्यकारी संपादक किरण पाटील,सरकारी वकील अँड राजेंद्र चौधरी,दीपेन राजपूत,डॉ नरेंद्र जाधव,कोठारी,राजेश भंडारी,जितेंद्र झाबक,राजेश खिलोसीया,प्रा चेतन शर्मा,मनोहर भावसार,जयदीप राजपूत,हेमंत ठक्कर,महेश देशमुख यासह प्रभागाचे जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
            कार्यक्रमासाठी दोडे गुजर भुवनचे सेक्रेटरी सी एस पाटील यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिल्याने त्यांचेही आभार मानण्यात आले.सूत्रसंचालन चेतन राजपूत तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी,नवीन अग्रवाल,चेतन जाधव बाळा राजपूत,प्रशांत लंगरे, योगेश पवार टीनू जगदाळे, आबा माळी,हार्दिक खिलोसिया, बंटी ठक्कर, अतूल सणस ,प्रसाद जानवे ,वस्तल शाह  शूभम वैष्णव, शाम शर्मा ,मयूर भावसार, अरूण महाजन, भाऊ  मराठे,गोलू मुंडके ,भद्रेश शहा, गिरीश शहा,जयसिंग परदेशी,तेजेंद्र जामखेडकर आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.