अमळनेर-कर्जमाफीचे आदेश आल्यापासून पुढील व्याज कोणत्याही शेतकरी बांधवांनी भरू नये तश्या सूचना प्रत्येक बँकांना दिल्या असून अश्या पद्धतीने कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले आहे.तसेच यंदाच्या आर्थिक वर्षांपासून जिल्हा बँकेच्या पीक कर्जात 10 टक्के वाढ झाल्याचे सुखद बातमी देखील त्यांनी शेतकरी बांधवाना दिली आहे.
            राज्य शासनाने संपूर्ण राज्यात अडचणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून दि,,पासून कर्जमाफी करण्याचे आदेश दिले आहेत,असे असताना काही बँका कर्जमाफी नंतर पुढील व्याज भरण्याचा तगादा लावत आहेत,कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे शेतकरी आधीच भरडला असताना त्याला अजून अधिक त्रास नको म्हणून सर्व बँकांना कर्जमाफीच्या आदेशांतरचे व्याज न घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत तरी देखील काही बँका व्याज भरण्याची मागणी करीत असल्यास त्वरित आ.अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शेतकरी बांधवाना करण्यात आले आहे.

जिल्हा बँकेच्या पीक कर्जात 10 टक्के वाढ

         जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मार्च नंतर मिळणाऱ्या पीक कर्जात यंदा 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय बँक संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक असलेले आ अनिल पाटील यांनी दिली आहे.म्हणजे सभासंदाची कर्ज मर्यादा जेवढी असेल त्यापेक्षा 10 टक्के कर्ज त्यांना अधिक मिळणार आहे.ज्या विका सोसायट्यांचे प्रस्ताव आधी गेले असतील ते देखील रिव्हाईज करून त्यातही 10 वाढ देण्याच्या सूचना संबंधित सोसायट्यांच्या सेक्रेटरीना केल्या असून या सूचना अमळनेर तालुक्यातील विकासो चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी लक्षात घ्याव्यात आणि प्रत्येक शेतकरी सभासदास 10 टक्के कर्ज वाढ द्यावी असे आवाहन आ अनिल पाटील यांनी केले आहे.
            दरम्यान कोरोना लॉक डाऊन मुळे अनेक शेतकरी प्रचंड अडचणीत आले असून घरात माल आहे पण संचारबंदीमुळे विकण्याची अडचण,भाजीपाला पिकला मात्र त्यालाही भाव नाही,कुठे नापिकीची समस्या अश्या अनेक संकटांनी शेतकरी घेरलेला असताना जिल्हा बँकेने 10 टक्के कर्जवाढ देऊन शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आधार दिला आहे,यासाठी जिल्हा बँकेचे संचालक असलेले अनिल पाटील यांच्यासह इतर संचालकांनी देखील हा आग्रह लावून धरला होता अखेर ही मागणी मान्य झाल्याने शेतकरी सुखावला आहे.अमळनेर मतदारसंघात लोकडाऊन काळात अत्यंत क्रियाशील भूमिका आ अनिल पाटील दाखवीत असून प्रत्येक घटकास काहिनाकाही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ते करीत असल्याने जनतेत समाधान व्यक्त होत आहे.