अमळनेर ( रिपोर्ट ) ३ मे नंतर सुरू झालेल्या वाढीव लॉक डाऊन कालावधीत गोरगरिबांना अन्न मिळावे म्हणून येथिल पिंपळे रोड परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन श्रीमती भानूबेन गोशाळेला एक दिवसासाठी मदतीचा हात दिला आहे.
पिंपळे रोड परिसरातील विठ्ठल नगर,आल्हाद नगर,टेलिफोन कॉलनी,आदर्श नगर,स्वामी विवेकानंद कॉलनी,बँक कॉलनी,श्रीकृष्ण कॉलनी,राधाकृष्ण नगर आदि कॉलनीमधून अन्नदातासाठी निधी संकलित करण्यात आला आणि गोक्षेत्र प्रतिष्ठाण चे चेतन शहा यांना सुपूर्द करण्यात आला.यावेळी भागवत,भास्करराव बोरसे,हिम्मतराव सोनवणे, सावंत सर,विरभान पाटील, संदिप घोरपडे, प्रा अशोक पवार आदि उपस्थित होते.
अमळनेर च्या गोरगरिबांसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत गोळा करून श्रीमती भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेच्या माध्यमातून ४ एप्रिल च्या एक दिवसाचे अन्नदान करण्यासाठी घेतलेला पुढाकार मानवतेची हाक देणारा आहे.संस्थेतर्फे चेतन शहा,राजू सेठ,प्रा अशोक पवार,चेतन सोनार,महेंद्र पाटिल,संदिप घोरपडे, रणजित शिंदे, गोपाळ धनगर आदिंनी आभार व्यक्त केले आहे.