ज्योत असे समतेची
शांती अन् स्वातंत्र्याचीसमृद्धीचे हे प्रतिक
गाथा ही बलिदानाची
लोक न्यूज
दि 15 ऑगस्ट 2025, वार - शुक्रवार रोजी जि.प.उच्च प्राथ केंद्र शाळा ,जैतपीर, ता. अमळनेर, जि.जळगाव येथे 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रथम उपस्थित मान्यवर सरपंच सौ.संगीता महेंद्र पाटील, उपसरपंच श्री. नारायण लोटन धनगर, शा.व्य.स. अध्यक्ष सौ राजेश्री राजेंद्र पाटिल, व पोलीस पाटील श्री.गोविंदा लोटन पाटील यांचे हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून उपसरपंच श्री.नारायण धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामूहिक राष्ट्रगीत,राज्यगीत, ध्वजगीताचे गायन, व तंबाखू मुक्त प्रतिज्ञा सर्वांकडून म्हणून घेतली. सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीताच्या धुनवर सामुहिक कवायत केली. तसेच ग्रामपंचायत ध्वजारोहणाचा ठिकाणी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत सादर केले.