लोक न्यूज
"हर घर तिरंगा अभियान – 2025" अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतर्फे दि. 14 ऑगस्ट रोजी शहराच्या इतिहासातील एक भव्य आणि अविस्मरणीय तिरंगा रॅली काढण्यात आली. राज्य शासन व नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीने संपूर्ण अमळनेर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून निघाले.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून 900 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजासह रॅलीचा शुभारंभ मा. स्मिताताई वाघ, खासदार जळगाव लोकसभा यांच्या हस्ते करण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या गजरात, विद्यार्थी, नागरिक, पदाधिकारी व अधिकारी यांच्या उस्फूर्त सहभागाने रॅली स्टेशन रोड मार्गे तिरंगा चौकापर्यंत पोहोचली. तेथे राष्ट्रगीत व राज्यगीताच्या ध्वनिफितीवर राष्ट्रध्वजास मानवंदना देत कार्यक्रमाचा भव्य समारोप झाला.

यावेळी आयोजकांकडून सर्व सहभागींस स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे यश हे नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयाचे फलित ठरले.

मा. खासदार स्मिताताई वाघ यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सर्वांना देशभक्तीची जाणीव करून देत सांगितले की, “नागरिक म्हणून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडून, तिरंग्याबद्दलची निष्ठा व देशाचा स्वाभिमान सदैव अबाधित ठेवणे हेच आपले सर्वोच्च ध्येय असावे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर अभियंता श्री. डीगांबर वाघ व दैनिक नवराष्ट्रचे संपादक श्री. संजय पाटील यांनी केले. मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

या प्रसंगी मा. खासदार स्मिताताई वाघ, मा. सौ. भैरवीताई वाघ-पलांडे, मा. डॉ. अनिल शिंदे, मा. श्री. नितिन मुंडावरे (उपविभागीय अधिकारी, अमळनेर), मा. श्री. विनायक कोते (पोलीस अधीक्षक, अमळनेर), मा. श्री. तुषार नेरकर (मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद), मा. श्री. दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक, अमळनेर), मा. श्री. नेमाडे (महावितरण, अमळनेर) तसेच शहरातील मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेरच्या प्रत्येक रस्त्यावरून, प्रत्येक चेहऱ्यावरून आज एकच संदेश घुमत होता –
"तिरंगा आमचा अभिमान, भारत देश आमचा स्वाभिमान!"

या भव्य रॅलीसाठी विशेष परिश्रम घेतलेले अधिकारी व कर्मचारी –
श्री. रवींद्र चव्हाण (उपमुख्याधिकारी), श्री. सुनील पाटील (स्थापत्य अभियंता), श्री. अजित लांडे (स्थापत्य अभियंता), श्री. कुणाल महाले (विद्युत अभियंता), श्री. सुदर्शन शामनानी (लेखापाल), श्री. कृणाल कोष्टी (लेखापरीक्षक), श्री. मयूर तोंडे (नगर रचनाकार), श्री. सौरभ बागड (नगर रचनाकार), श्री. किरण खंडारे (स्वच्छता निरीक्षक), श्री. संतोष माणिक (स्वच्छता निरीक्षक), श्री. गणेश गोसावी (अग्निशमन अधिकारी), श्री. संदीप पाटील (संगणक अभियंता), वैद्यकीय अधिकारी श्री. विलास महाजन व श्री. प्रवीण शेलकर, श्री. महेश जोशी, श्री. लौकिक समशेर, श्री. रोहित रामोळे, श्री. कैलास कसाब, श्री. विनोद पाटील, श्री. प्रवीण बैसाणे, श्री. भाऊसाहेब सावंत, श्री. चंद्रकांत मुसळे, शहर समन्वयक श्री. गणेश गढरी.