लोक न्यूज

अमळनेर -  प्रथमच शहरात सोनल मगर  यांच्या वतीने "तेजल क्लासेस, आनंद कॉलनी, अमळनेर" येथे दि २७ रोजी मोफत भव्य ब्युटी सेमिनारचे आयोजन करण्यात आले.ह्या कार्यक्रमाला शेकडो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
           या सेमिनारचे प्रमुख पाहुणे म्हणून लेडीज फॅशन डिझायनर सौ.राजश्री चंद्रकांत काटे ह्या उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाने व उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना पाटील व तेजस्विनी संदनशिव यांनी केले.
        या कार्यक्रमाला जयश्री सुनील घाटे, अनुपमा परमार या तज्ज्ञांनी सौंदर्य विषयक विविध तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारचे मेकअप, त्वचा व केसांची निगा, आधुनिक ब्युटी ट्रीटमेंट्स व विविध प्रोडक्ट याबाबत उपयुक्त माहिती मिळाली.
            प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या अमळनेर येथील सौ राजश्री काटे यांनी महिलांना आजच्या काळात सौंदर्य व कपड्यांच्या शिवणकामाच्या विषयाची आपली कला दाखवत नवनवीन तंत्र शिकुन आपण  व्यवसायिक दृष्टीकोनठेवून स्वतःची प्रगती कशी करावी त्यासंबंधीची माहिती उपस्थित महिलांना दिली.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीमा पाटील व साधना पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.त्यांच्या मुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला.सोनल मगर यांनी उपस्थितांचे आभार मानून पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांना सेमिनार प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाची सांगता  करण्यात आली.सदर सेमिनारमध्ये अनेक महिलांनी सहभाग नोंदवून सौंदर्य व्यवसायातील नवनवीन तंत्र शिकण्याची संधी साधली.उपस्थितांनी संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक केले.