लोक न्यूज
अमळनेरची मुलुख मैदान तोफ विधानसभेत अमळनेरचे ३ वेळा (सन १९७८, १९८०,१९९०)प्रतीनिधित्व ज्यांनी केले असे जनतेचे लाडके माजी आमदार साथी गुलाब बापू ज्यांना पूर्व व पश्चिम खान्देश "शिंगाड्यावाला शेतकरी नेता" म्हणून ओळखत असे. त्याचप्रमाने शोध पत्रकारीतेत आपला वेगळा ठसा उमटविणारे (साथी- संदेश) साप्ताहिक दैनिकांत रुपांतरीत करून लोकांना वर्तमानपत्र वाचनाची आवड लावणारे. आपल्या चौफेर वाचनाने साहित्य विश्वाला आपलेसे करणारे. शत्रूलाही शरण आल्यावर मरणदारातून परत आणणारे, अनेकांकडे आवडीने खायला जाणारे व आपल्याकडे त्यांना आदराने खाऊ घालणारे खवैय्या गुलाब बापू आपल्या अचानक कृतीने राजकारणात खळबळ उडवणारे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील आज आपल्यात नाहीत. याला दोन वर्षे होत आलंय, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ,अमळनेर चे साने गुरुजी विद्यालय बापूंच्या विविध गुणांना पुढील पिढी सोबत जोडण्यासाठी दरवर्षी
साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह

या कार्यक्रमाचे आयोजन करीत राहील.


राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा- दिनांक- २४/०८/२०२५ वार- रविवार (महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी)विषय:

दिनांक- २५/०८/२०२५ वार सोमवार
१). सामाजिक पुरस्कार
२) राजकीय (पुरोगामी) पुरस्कार
वितरण करणार आहोत.
स्वरूप : - २१०००/- रोख स्मृती चिन्ह (शिंगाडेधारी गुलाबराव पाटील) आणि लाल टोपी, रुमाल (बागायतदार)

१.भारतीय संविधानाची ७५ वर्ष- एक चिंतन.

२.आज गांधीजी असते तर...

३.शेतकरी कष्टकऱ्यांचे कैवारी- सानेगुरुजी.

४.कृत्रिम बुद्धिमत्ता:आधार की आव्हान?

५.अरे माणसा माणसा कधी होशील माणूस.                                          

पारितोषिके स्वरूप :-                         प्रथम ११०००/-                                      द्वितीय९०००/-                                तृतीय ७०००/-,                           उत्तेजनार्थ - २ प्रत्येकी २०००/-विजेत्यांना आकर्षक स्मृती चिन्ह, व इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

वरील उपक्रमांसाठी तीनही प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

१. सामाजिक पुरस्कार निवड समिती

२. राजकीय (पुरोगामी) निवड समिती

३. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन समिती

४. साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह आयोजन समिती

सोबतच या स्मृती समारोहाच्या यशस्वीतेसाठी अनेक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमात वक्ते-मा.मा.आमदार बच्चुभाऊ कडू निरंजन टकले हे मान्यवर जी भुमिका मांडणी करतील ती समाजहिताची, तरुणांना योग्य दिशेची, शेतकऱ्यांना आस भविष्याची, महिलांना खात्री सुरक्षिततेची, आणि विशेष म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या कठीण प्रश्नांची या बाबींमुळे एकूणच देशातील जनतेला प्रेरणा मिळेल संविधान बचावाची.

संदीप घोरपडे .                                      सचिव - अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, अमळनेर जि. जळगाव.              हेमकांत जयवंतराव पाटील.               अध्यक्ष- अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, अमळनेर. जि. जळगांव.