अमळनेर- : लोक न्यूज

उत्तर महाराष्ट्रातील भाविकांसाठी व प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे खासदार स्मिताताई वाघ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तिरुपती-हिसार (खाटू श्याम) एक्सप्रेस गाडीला अखेर अमळनेर स्थानकावर अधिकृत थांबा मिळाला आहे. आज या गाडीचा पहिला थांबा अमळनेर येथे घेण्यात आला. या क्षणी अमळनेर रेल्वे स्टेशनवर गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. या सोहळ्याला डॉ. अनिल शिंदे, शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, ग्रामीण मंडल अध्यक्ष राहुल पाटील, लालचंद सैनानी, हरचंद लांडगे, नीरज अग्रवाल, श्याम पाटील, प्रीतपालसिंग बग्गा, सरचिटणीस भरतसिंह परदेशी, महेश पाटील, सुभाष मामा, महेश संदनशिव तसेच स्टेशन मास्टर अनिल जी. शिंदे उपस्थित होते.

खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेला हा थांबा अमळनेर शहर व परिसरातील नागरिकांसाठी मोठी सोय ठरणार आहे. खाटू श्याम बाबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह तिरुपतीकडे जाणाऱ्या यात्रेकरूंनीही याचा लाभ होणार असून त्यांनी यावेळी खासदार स्मिताताईंचे मनःपूर्वक आभार मानत गाडी चे उत्स्फूर्त स्वागत केले.