अमळनेर-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसा पासून प्रलंबित असलेली अमळनेर येथील शासकीय कापूस खरेदी अखेर दिनांक १८ (सोमवार) पासून सुरु होणार आहे. नोंदणी केलेल्या कापूस उत्पादकाना कृषि उपन्न बाजार समिति मार्फत नोंदणी क्रमांक नुसार कळविन्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर बंद असलेली शासकिय कापूस खरेदी केंद्र सुरु होण्यासाठी राज्याचे पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटिल यांच्या समवेत आ.स्मिता वाघ यांनी चर्चा केली होती त्यानंतर कापूस खरेदी केंद्र चालु करण्यात येणार होते परंतु अमळनेर येथील कोरोना बाधित रुग्ण संख्या शंभरीपार गेल्याने खबदारीचा उपाय म्हणून सदर केंद्र विशेष शासकीय आदेशा अन्वये बंद करण्यात आले होते.सदयस्थितित कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असून आगामी हंगाम जवळ आल्याने कापूस खरेदी केंद्र सुरु होणे अत्यंत गरजेचे होते. त्यानुसार आ.स्मिता वाघ यांनी जिल्ह्याधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांची भेट घेवून कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली त्यानुसार अमळनेर येथील शासकीय कापूस खरेदी केंद्र व कृषि उपन्न बाजार समिति दिनांक १८ (सोमवार) पासून सुरु होणार आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिग चे काटेकोर पणे पालन करण्यासाठी दिवभरात २० वाहनाची मोजनी केली जाणार असून संबधित कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषि उपन्न बाजार समिति मार्फत कळविन्यात येणार आहे. याव्यतिरिक्त वाहन आल्यास त्याची मोजनी केली जानार नाही असे आवाहन बाजार समिति सभापती प्रफुल्ल पवार व संचालक मंडळाने केले आहे.