अमळनेर-शहरात गेल्या चार दिवसांपासून एकही अहवाल प्राप्त नसताना काल आ.अनिल पाटील यांनी केलेल्या हलचालीमुळे एकाचवेळी 41 जणांचे अहवाल प्राप्त होऊन हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने भीतीग्रस्त झालेल्या अमळनेरकराना प्रचंड मोठा दिलासा मिळाला,विशेष म्हणजे आ पाटील यांच्या उपस्थितीत काल सायंकाळी एकाच वेळी 38 जणांची कोविड केअर सेंटर येथून मुक्तता करण्यात आली.
यावेळीं आ.अनिल पाटील,माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,प्रांताधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे,व न प चे संजय चौधरी उपस्थित होते.आमदारांनी सुटका झालेल्या सर्वांचे कौतुक करत सॅनिटायझर व मास्क वाटप केल्यानंतर काही सूचना देत त्यांना घरी सोडण्यात आले.दरम्यान अमळनेर येथील अजुन 26 अहवाल प्रलंबित असून ते अहवाल देखील लवकरच प्राप्त होतील अशी ग्वाही आमदारांनी यावेळी दिली.दरम्यान आज दुपारी आ अनिल पाटील यांनी कोविड सेंटर येथे भेट दिली असता क्वांरटाईन असलेल्या व्यक्तींनी आमचे अहवाल लवकर प्राप्त करून द्या अशी विनंती केली होती यावर आमदारांनी त्वरित अहवाल मागविण्याचा शब्द देऊन अहवाल निगेटिव्ह असल्यास त्वरित सुटका करण्याचे संकेत दिले होते,त्यानुसार आमदारांनी प्रशासनाशी चर्चा करून धुळे येथे प्रयोग शाळेत संपर्क करून त्वरित अहवाल देण्याच्या सूचना केल्याने हालचाली वेगात होऊन सायंकाळीच सर्व अहवाल पाठविण्यात आले.आमदारांनी एका दिवसात आपला शब्द खरा करून दाखविल्याने सुटका झालेल्या व्यक्तींनी आमदारांचे आभार मानले.
दरम्यान जनता कर्फ्युत आता शिथिलता आणली असली तरी नागरिकांनी अजूनही कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडता घरीच सुरक्षित राहावे असे आवाहन केले आहे.