अमळनेर: गावपातळीवर कोरोना विरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देऊन गौरविण्यात आले.
अमळनेर तालुक्यातील झाडी येथे गावपातळीवर कोरोना या साथीच्या आजारविरुद्ध काम करणारे ग्राम पंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनिस व आशा सेविका यांना 14 व्या वित्त आयोगातून प्रत्येकी 1000 रु. चा धनादेश सहा जणांना देऊन कोरोना लढवय्ये म्हणून गौरविण्यात आले.गावाचे सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या हस्ते त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात आला .