लोक न्यूज
अमळनेर-येथील न्यू प्लॉट परिसरात पहाटे पहाटे महिलांकडून भुरट्या चोऱ्यांचा सपाटा सुरू झाला असून कागद व खाली बाटल्या जमा करण्याच्या बहाण्याने काही कामाचे साहित्य देखील चोरून नेले जात आहे.
       काही महिलांनी  वेफर्स वाल्याचा तेल डबा,रासमंजू कॉम्प्लेक्स मधून व्हीलचेअर,बॅनर्स च्या लोखंडी फ्रेम,यासह अनेक मोठ्या वस्तू लंपास केल्या आहेत.पहाटे ५ वाजता सर्वत्र शांतता  असताना या महिला प्लास्टिक बाटल्या,पिशवी, कागद जमा करण्याच्या बहाण्याने प्रवेश करतात आणि कुणाच्याही वाड्यात थेट प्रवेश करून दिसेल ती वस्तू हातात घेऊन लंपास करीत असतात,त्यानंतर या महिला त्यांची रिक्षा एकाठिकाणी बोलवून चोरलेले सामान लंपास करीत असतात.खरे पाहता हा भुरट्या चोरीचा प्रकार वाटत असला दिवसेंदिवस या महिलांची हिम्मत वाढत असून पुढे घरफोडी सारखे प्रकार करून मोठा हात मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी पोलिसांनी आतापासून यांच्यावर नजर ठेवून पायबंद घातल्यास नक्कीच या चोरीला आवर घातला जाणार आहे.
    कचरा जमा करणाऱ्या सर्वच महिला चोर असाव्यात असे मुळीच नाही परंतु यात काही ठराविक महिलांची गॅंग असण्याची शक्यता असून पोलिसांनी यांना प्लास्टिक जमा करण्यासाठी पहाटेची बंदी घालून सकाळी ८ वाजेनंतरच मुभा द्यावी जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत.अशी मागणी न्यू प्लॉट परिसर विकास मंचतर्फे करण्यात आली आहे.