लोक न्यूज
अमळनेर : अल्पवयीन मुलीला डान्स शिकवण्याच्या उद्देशाने तिच्यावर अत्याचार करत तिला व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नावाने ब्लॅक मेल करून बौद्ध धर्माचा स्वीकार करायला लावला आणि जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी एकावर बलात्कार व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र अनिल संदानशीव असे आरोपीचे नाव आहे.
     याबाबत पीडितेने फिर्याद दिली की ती सुरत  येथील रहिवासी असून शिक्षणासाठी ती अमळनेर प्रताप महाविद्यालयात शिकत होती.  २०१९ मध्ये प्रताप महाविद्यालयात स्नेहसंमेलन असल्याने तिने जित स्टुडिओ आणि फिटनेस क्लास चे संचालक जितेंद्र अनिल संदानशिव वय ३३ रा फरशी रोड अमळनेर यांच्याकडे क्लास लावला होता. जितेंद्र याने त्याच्या घरी नेऊन पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचे व्हिडीओ व फोटो काढले. आणि जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. फेब्रुवारी २० मध्ये जितेंद्र ने पीडितेला प्रताप कॉलेज च्या हॉस्टेल मधून घेत धार ता अमळनेर येथे नेले व जवळच्या शेतात पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. २०२१ मध्ये तरुणीने बारावी पूर्ण केल्यानंतर फार्मसी कॉलेजला पुणे येथे प्रवेश घेऊन ती मावशीकडे राहत असताना जितेंद्र तेथेही जाऊन पोहचला व त्याने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध केले. आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लग्न करण्याची गळ घालू लागला. २८ जून २०२२ मध्ये जितेंद्र ओळखीच्या लोकांना घेऊन कार मध्ये बसवून ठाण्याला घेऊन गेला आणि पीडितेशी विवाह लावला. आणि तेथून अमळनेर ला पळवून घेऊन आला. नन्तर १४ ऑगस्ट २०२२ रोजी त्याच्या आईवडिलांनी तिला बौद्ध धर्मचा स्वीकार करायला लावला आणि त्या पद्धतीनुसार पुन्हा विवाह लावला. त्यांनतर जितेंद्रने तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. पीडितेने तिच्या भावाला ९ ते ११ फेब्रुवारी २०२५ दरम्यान व्हाट्सएपवर संदेश टाकला की मला वाचवा.  २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पीडिता तिच्या माहेरी सुरत येथे निघून गेली. पीडितेने अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून अमळनेर पोलिसस्टेशनला आरोपी जितेंद्र संदाणशीव याच्या विरुद्ध  भादवि कलम ३७६
३७६ (२)(१),३७६(२)(न) ,३७६(३) पोस्को कायद्यानुसार कलम ३(अ), ४(क), ५(क ) ५(ल),६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत