अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब मोहनराव पाटील,पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचे आज अमळनेर नगरीत आगमन होत असून त्यांच्या हस्ते अमळनेर अर्बन बँकेच्या अद्ययावत इमारतींचे लोकार्पण,क्रीडा संकुलात बहुउद्देशीय हॉल चे लोकार्पण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकास कामांचा पायाभरणी समारंभ पार पडणार आहे.
अमळनेर को.ऑप.अर्बन बँकेचा शतकमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सभासद ग्राहक मेळावा छ.शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आज २९ मे रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून याप्रसंगी बँकेच्या अद्ययावत सोयींनी युक्त नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव रघुनाथ पाटील हे असतील. प्रति पंढरपूर वाडी संस्थानचे गादीपती प.पू.ह.भ.प.संत प्रसाद महाराज यांची यावेळी आशिर्वादपर उपस्थिती राहणार आहे.जलसंपदा मंत्री ना.गिरीश दत्तात्रय महाजन यांचेसह खा.स्मिता उदय वाघ,माजी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आ. अनिल भाईदास पाटील यांचे हस्ते बँकेच्या विविध दालनांचे उद्घाटन होणार आहे.यावेळी आमदार अमोल चिमणराव पाटील, आ.सत्यजित सुधिर तांबे यांच्या हस्ते विविध सभासद ग्राहक ठेवीदारांचा सन्मान होणार आहे.कार्यक्रमास माजी आ.डॉ.बी एस पाटील,माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील,माजी आ.शिरीष हिरालाल चौधरी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वासराव जयदेव ठाकूर, महाराष्ट्र अर्बन को.ऑप.बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय जव्हेरीलाल ब्रम्हेचा, जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, सहकार भारतीचे संघटन मंत्री दिलीप रामू पाटील, सहकार आयुक्त दिपक तावरे ,विभागीय सहनिबंधक संभाजी निकम सहकार भारती प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय बिर्ला,जिल्हा निबंधक गौतम बालसाने, अमळनेर सहाय्यक निबंधक कुणाल सोनार, व्ही.एम.जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर समारंभास अमळनेर अर्बन बँकेच्या सभासदांनी, ग्राहक ठेवीदार व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांचेसह संचालक प्रविण जैन ,लक्ष्मण महाजन भरतकुमार ललवाणी, प्रदिप अग्रवाल, दिपक साळी,अभिषेक पाटील, प्रविण पाटील ,पंडित चौधरी ,मोहन सातपुते,सौ. वसुंधरा लांडगे, डॉ.मनीषा लाठी,अँड.व्ही आर पाटील ,अँड.विजय बोरसे बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले आहे.
क्रीडा संकुलात लोकार्पण सोहळा
अमळनेर येथील मारवड रस्त्यावरील तालुका क्रीडा संकुलात बहुउद्देशीय हॉल चा लोकार्पण सोहळा सकाळी 11 वाजता पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व सहकार मंत्री ना बाबासाहेब मोहनराव पाटील,जलसंपदामंत्री ना गिरीश महाजन खा स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,तालुका क्रीडा समन्वयक सुनिल वाघ,क्रीडा संघटना कार्याध्यक्ष संजय पाटील,वास्तुविशारद प्रदीप देशपांडे,अमृत पाटील, जितेंद्र भामरे व कुणाल सोनार यांनी केले आहे.
बाजार समितीत विकास कामांचा शुभारंभ
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार मंत्र्यासह इतर मंत्री महोदय व मान्यवारांच्या उपस्थितीत शतकपूर्ती दशक समारंभा निमित्त विविध विकास कामांचा पायाभरणी समारंभ होणार आहे.सदर कार्यक्रम बाजार समितीत दुपारी 12.30 वाजता होणार असून कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील व संचालक मंडळाने केले आहे.