लोक न्यूज
अमळनेर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित स्मितोदय फौंडेशन तर्फे मुंदडा फौंडेशनच्या सहकार्याने महिलांसाठी १ जून रोजी भव्य मॅरेथॉन आणि वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.महिलांनी सक्षम व्हावे , शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ३५ वर्षांपर्यंतच्या तरुणींसाठी अडीच किमी धावण्याची स्पर्धा तर ३५ वर्षे वरील महिलांसाठी ५ किमी चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून सकाळी ७ वाजता नोंदणी सुरू होईल. प्रत्येक स्पर्धेत प्रथम पाच क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र बक्षिस देण्यात येणार आहे. तर प्रत्येक सहभागी महिलेला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी व तरुणींनी सहभागी व्हावे असे आवाहन स्मितोदय फौंडेशनच्या खासदार स्मिता वाघ , भैरवी वाघ- पलांडे यांनी केले आहे.
स्पर्धेसाठी अमेय मुंदडा 8600505545, संजय पाटील 9422734106, सुनील वाघ 9579294827, माधुरी पाटील 82084 07378, रंजना देशमुख 9422716950, प्रा शिला पाटील 9422409959, स्नेहा एकतारे 9423902965, वसुंधरा लांडगे 9689037841, स्वप्ना पाटील 8805583355 यांच्याशी संपर्क साधून नावे नोंदणी करावी.