लोक न्यूज
फॅमिला डॉक्टर म्हणजे असा वैद्यकीय व्यावसायिक जो संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतो. तो फक्त आजारावर औषध देत नाही, तर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या प्रवासात मार्गदर्शन करतो,सहभाग देतो आणि काळजी घेतो.
*सततची वैद्यकीय देखभाल (Continuity of Care)*
आपले फॅमिली डॉक्टर आपल्याला दीर्घकाळ ओळखत असल्यामुळे तुमच्या वैयक्तिक व कौटुंबिक आरोग्य इतिहासाची सखोल माहिती त्यांना असते. त्यामुळे ते कमी वेळेत योग्य निदान करून उपचार करत असतात.आपले आर्थिक गणित सांभाळताना यामूळे खूप फायदा होतो.
*सर्व वयोगटांकरिता उपचार (Treatment for All Ages):*
फॅमिली डॉक्टर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे आरोग्य सांभाळतात.कुठल्याही वयोगटाचा रूग्ण असेल तरी ते शक्य तेवढे उपचार करून आपल्याला बरे करत असतात.आपल्या कुटूंबातील सदस्याप्रमाणेच ते आपल्याला जवळचे आणि अधिक विश्वासार्ह वाटतात. कुटूंबातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांवरच ते उपचार करत असल्यामूळे औषधांच्या अँलर्जीचा इतिहास,औषधांचा होऊ शकणारा त्रास,औषध घेण्याच्या वेळा ते सुरळीतपणे समजावून सांगू शकतात.
*रोगाचे वेळेवर निदान (Early Diagnosis):*
ते आपली नियमित आरोग्य तपासणी करत असल्यामूळे गंभीर आजार त्यांना लवकर ओळखता येतात व उपचारही वेळेवर करता येतात.कुटूंबातील सदस्यांबद्द्ल,त्यांच्या आरोग्यविषयक बाबींबद्द्ल ते सखोल जाणून असतात.कुणाला कुठला त्रास झाल्यावर किती तीव्रता येते याचाही त्यांचा अभ्यास झालेला असतो.त्यामूळे गंभीर परिस्थितीची जाणीव त्यांना पटकन होते आणि त्याचा रूग्णाला शारीरीक,आर्थिक आणि मानसिकरित्या फायदाच होतो.कुठल्याही साथीच्या काळात आपल्या पाठीशी उभे राहणारे आपले फॅमिली डाॅक्टर्स त्यांच्या आश्वासन चिकित्सेच्या जोरावर रोगाशी लढण्याला बळ देतात.कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी हे अनुभवलं असेलच.आजारपणात कौटुंबिक सदस्याप्रमाणे धीर देणारे आणि त्याच बरोबर उपचार करणारे आणि गरज पडल्यास योग्य ठिकाणी उपचारास पाठविणारे आपले फॅमिली डाॅक्टर्स असतात.
*मुलभूत व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा (Preventive Care):*
लसीकरण, आरोग्य तपासणी, जीवनशैली याविषयी ते मूलभूत आणि वापरण्याजोगा सल्ला देतात यामुळे आजार टाळता येतात.आपल्या कुटूंबातील सगळ्याच सदस्यांची त्यांना माहीती असल्यामूळे त्यांचा सल्ला आपल्याला योग्य वाटतो.कुटूंबातील सदस्यांच्या चुकीच्या आहार विहाराच्या सवयींबद्द्ल,व्यसनांबद्द्ल ते स्पष्टपणे पण आत्मीयतेने बोलतात.खूप वेळा एखाद्या सदस्याचे व्यसन सोडविण्यासाठी वैयक्तिक प्रयत्नही करतात.
*मन:शांती व विश्वास (Trust & Comfort):*
परिचित डॉक्टर असल्यामुळे रुग्ण मनमोकळेपणाने बोलू शकतो, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी होतात.दवाखान्यात आल्यानंतरही कम्फर्ट आणि मोकळेपणा जाणवतो त्यामूळे बरे होण्याला आणखी कमी वेळ लागतो.खूपदा वैयक्तिक अडचणींमध्ये सल्ला आणि मदत करतात त्यामूळे अडचणींवर मात करण्यास मदतचं होते.मानसिक ताणातून येणार्या आजारपणांची जाणीव कधी कधी रुग्णापेक्षा फॅमिली डाॅक्टर्सलाच आधी होते.त्यासंबंधी ते आपल्याशी प्रत्यक्ष बोलतात आणि मार्गदर्शनही करतात.
*खर्च कमी होतो (Cost-Effective):*
रूग्णाला थोडं जरी बर वाटत नसेल आणि तो जर लगेच डाॅक्टर्स कडे गेला तर लवकर निदान आणि उपचार करता येतात आणि असं फॅमिली डाॅक्टर्स च्या बाबतीत खूप वेळा होतं. याचा सरळ फायदा रूग्णाला होऊन बर्याच वेळा आजार गंभीर होणं टाळता येतं आणि हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा खर्च खूप वेळा वाचतो.म्हणजे तूमच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन कोलमडू नये(बर्याच वेळा ते आजारपणांमूळे कोलमडतं) याची काळजीही तूमचे फॅमिली डाॅक्टर्स घेत असतात आणि तूमच्या कुटूंबाचा एक नियमित फॅमिली डाॅक्टर असणं यामूळे जास्त गरजेचं आहे.
आजारांच सतत बदलणारं स्वरूप बघता प्रत्येक आरोग्य शाखेत विशेषज्ञाची गरज आहेच.पण,तरीही तूम्हाला कुठलाही वैद्यकीय उपचार घेताना फॅमिली डाॅक्टर्स हे नेहमीच दिशादर्शक ठरत असतात.
फॅमिली डॉक्टर हे केवळ डॉक्टर नसून आरोग्यविषयक मार्गदर्शक, सल्लागार आणि कधी कधी कुटुंबासारखेच असतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने एक विश्वसनीय फॅमिली डॉक्टर निवडायला हवा आणि आरोग्यविषयक कुठल्याही समस्येसाठी सर्वप्रथम आपल्या फॅमिली डाॅक्टर्स चा सल्ला घेणं नेहमीच महत्वाचं ठरतं.
*डॉ.रूपाली दिनेश पाटील*
बी.ए.एम.एस.(पुणे)
*डॉ.दिनेश गोकूळ पाटील*
बी.ए.एम.एस.(पुणे)
सी.एस.के.(मुंबई)
*फॅमिली डाॅक्टर्स आणि मूळव्याध-फिशर-भगंदर तज्ञ*
*धन्वंतरी हाॅस्पिटल,धुळे रोड,अमळनेर*
फोन नं.02587 222922