लोक न्यूज
आज २५ जून – भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जाणारा आणीबाणी दिन, खासदार स्मिताताई वाघ यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात आणीबाणी काळातील थेट साक्षीदार व जेष्ठ नेते मा. सुभाष अण्णा चौधरी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमात चौधरी यांनी १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीची पार्श्वभूमी, तिचा हेतू, त्याचा देशभरातील सामान्य जनतेवर, विरोधकांवर आणि विशेषतः कार्यकर्त्यांवर झालेला परिणाम याचे वास्तववादी चित्रण केले या वेळी त्यांनी आजच्या तरुण कार्यकर्त्यांना आवाहन केले की, इतिहास समजून घ्या, विसरू नका. लोकशाहीची किंमत संघर्षातूनच कळते.
“लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना गालबोट लावणारा हा काळ होता. संविधानिक हक्क रद्द, पत्रकारितेवर गळचेपी, विरोधी नेत्यांची अटक, सर्वसामान्यांमध्ये दहशत... देशाला गाजवणारा हा काळ आम्ही अनुभवला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी तुरुंगवास पत्करला, पण संघर्षाचा मार्ग सोडला नाही,”
— असे सुभाष अण्णा चौधरी यांनी सांगताना अनेक घटनांचा उल्लेख केला. या कार्यक्रमात डॉ अनिल शिंदे,व्ही आर आप्पा, भाजपा जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोंडा मंडल अध्यक्ष राहुल पाटील, भाजपा अमळनेर शहराध्यक्ष, योगेश महाजन,माजी मा. पंचायत समिती सदस्य श्याम अहिरे, माजी जि प सदस्य संदीप पाटील, आपत्काल समिती जिल्हा संयोजक महेंद्र सर,आपत्काल समिती शहर मंडल संयोजक गोकुळ परदेशी,सहसंयोजक भगतसिंग परदेशी,खाशी संचालक माधुरी पाटील,माजी शहराध्यक्ष विजय राजपूत, उमेश वाल्हे,पांडुरंग महाजन, महेश पाटील,दिलीप ठाकूर,दिलीप साळी, सुभाष पाटील, महावीर मोरे, अनिस खाटीक,राम भैय्या कलोसे, रमेश देव, कैलास भावसार,घनश्याम पाटील रवी ठाकूर,दिनेश सोनवणे सोनवणे प्रवीण पाटील, राहुल पाटील सर , दौलत सोनार,युवा मोर्चा देविदास लांडगे शहर मंडल अध्यक्ष, सरचिटणीस समाधान पाटील,राहुल चौधरी,सौरभ पाटील,देवा भोई, दीपक बोरसे, सागर शेटे,निखिल धनगर व विविध आघाड्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.