लोक न्यूज
अमळनेर :- शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मदतीने पोलिसांनी अमलात आणलेले नेत्रम खूप उपयोगी पडणार आहेत. नागरिकानी देखील पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणू नये. असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी अमळनेर शहरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या एकत्रित नियंत्रण कक्षाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
       आमदार अनिल पाटील यांनी आमदार निधी आणि डीपीडीसीच्या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा तथा तिसरा डोळा देउन त्याचे नियंत्रण पोलिसांकडे दिल्याने त्याचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.आमदार पाटील हे आजारी असल्याने ते याप्रसंगी उपस्थित राहू शकले नाही.कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , माजी जि. प. सदस्य जयश्री पाटील , डीवायएसपी विनायक कोते , डीवायएसपी केदार बारबोले उपस्थित होते. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून नेत्रम ही संकल्पना राबवण्यात आली असून अमळनेर शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण आता पोलीस स्टेशन मधून होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक रेड्डी म्हणाले की आमदार अनिल पाटील यांचा आमदार निधी आणि लोकसहभागातून बसवलेल्या  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व संपूर्ण यंत्रणेची  देखभाल दुरुस्ती आता पोलीस करणार आहेत. नेत्रम यंत्रणा आणि ई बिट ऍप माध्यमातून पोलीस प्रशासन गतिमान झाले आहे. प्रास्ताविक करताना डीवायएसपी विनायक कोते म्हणाले की शहरातील विविध चौक आणि रस्ते ११० कॅमेऱ्यानी जोडले गेले आहे. इतरही भागातील कॅमेरे नेत्रम यंत्रणेशी जोडून शहर व तालुका अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमळनेर पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी डीवायएसपी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रयत्नांतून ही यंत्रणा पूर्णपणे उभारली गेली आहे. यावेळी जयश्री पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या विकास निधीतून यंत्रणा उभारल्याचे सांगत आजस्थितीला शहराच्या व तालुक्याच्या विकासात भर पडत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले.

आमदारांनी दिलेला तिसरा डोळा पोलिसांसाठी ठरणार अस्त्र

नेत्रम च्या माध्यमातून आमदार अनिल पाटील यांनी दिलेला तिसरा डोळा अमळनेर पोलिसांसाठी अस्त्रच ठरणार आहे.यामाध्यमातून बस स्टँड असेल,रेल्वे स्टेशन असेल,मार्केट असेल किंवा बाजारपेठ असेल चोऱ्या चपाट्याच्या घटनांना अंकुश बसणार असून समाज कंटकाकडून होणारे कृत्य  असतील, चेन स्नेशिंग असेल किंवा मुलींना पळविणे असेल अश्या अप्रिय घटनांवर पोलिसांना नजर ठेवता येणार आहे.आमदारांनी दूरदृष्टी ठेऊन हा निर्णय घेतला आहे.लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेचा सार्वभौम विचार करताना ते दिसत असून युवा वर्ग तथा क्रीडा क्षेत्र साठी क्रीडा संकुल डेव्हलपमेंट  असेल,बालक व  अबाल वृद्धांसाठी ओपन प्लेस डेव्हलपमेंट असेल,आरोग्य सेवेसाठी ग्रामिण रुग्णालयाचे वृद्धीकरण असेल, प्रवाश्यांसाठी बस स्टँड चा विकास असेल अशी अनेक पब्लिक इंटरेस्ट ची कामे त्यांच्या माध्यमातून आज होत आहेत.

शाळा व महाविद्यालयात जनजागृती मोहीम राबविणार

      मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस आणि  महिला दक्षता समितीच्या मदतीने शाळा व महाविद्यालयात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून त्याबाबत शाळांना पत्रव्यवहार झाल्याचे पोलीस निरीक्षक निकम यांनी सांगितले.
        कार्यक्रमास महिला दक्षता समितीच्या सुलोचना वाघ , माधुरी पाटील , प्रा शीला पाटील , प्रमोदिनी पाटील , अलका गोसावी ,भारती शिंदे ,  डॉ राजेंद्र पिंगळे ,विक्रांत पाटील , मुख्तार खाटीक , महेंद्र बोरसे , जिजाबराव पाटील ,  योगेश महाजन ,राकेश पाटील ,संजय पाटील ,सुरेश पाटील , इम्रान खाटीक , सलीम टोपी , पंकज चौधरी , बाळासाहेब संदानशीव , आरिफ तेली ,फिरोज मिस्तरी हजर होते.