लोक न्यूज
नवी दिल्ली – जळगांव धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन पाण्याच्या गरजा लक्षात घेता, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – त्वरीत सिंचन लाभ कार्यक्रम (PMKSY-AIBP) अंतर्गत ‘लोअर तापी प्रकल्प (Lower Tapi Project)’ याचा समावेश करण्याच्या प्रस्ताव आता जलशक्ती मंत्रालय कडे पाठविण्यात आला आहे.
दिनांक १२ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली येथे सचिव (व्यय) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (Public Investment Board – PIB) महत्वाच्या बैठकीत या प्रकल्पाचे सखोल मूल्यांकन करण्यात आले. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचे इतिवृत्त पुढील कार्यवाहीसाठी जलशक्ती मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहे.