अमळनेर(रिपोर्ट)
अमळनेर :- तालुक्यात रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर टंचाई असून पेरणी होऊन दोन महिने झाले तरी कित्येक शेतकरी आपल्या पिकांना खते देवू शकले नाहीत. कृषी विभागाचे अधिकारी यांनी ही याबाबत फक्त दिशाभूल करण्याचे काम केले असून त्यामुळे तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांना तत्काळ हटवण्यात यावे *अशी मागणी रवि पाटील देवा गृप फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष व धार गावाचे मा उपसरपंच सरपंच रवि पाटील* यांनी केली आहे.     तालुक्यात तुटवडा असल्याने अनेक शेतकरी बाहेरच्या तालुक्यातून खते आणत आहेत. शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात खते उपलब्ध करून देण्यास तालुका कृषी अधिकारी असमर्थ ठरले आहेत. त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. तसेच आज रॅक लागणार, उद्या रॅक लागणार अशी खोटी माहिती लोकप्रतिनिधींना देवून त्यांची ही दिशाभूल केली जात आहे. शेतकऱ्यांच्या विविध तक्रारींचा निपटारा ही होत नसून शेतकरी नियोजनशून्य कारभाराला कंटाळले आहेत. तालुका कृषी अधिकारी आपल्या कार्यालयात नियमित उपस्थित राहत नाहीत त्यामुळे त्यांचा यंत्रणेवर वचक नसल्याचा आरोप रवि पाटील यांनी केला आहे.  
        शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध न झाल्याने त्यांच्या उत्पन्नात घट होणार असून त्याला तालुका कृषी अधिकारी हेच जबाबदार असतील. त्यामुळे त्यांना न हटवल्यास त्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा शेतकऱ्यांना घ्यावा लागेल, अशी तक्रार रवि पाटील यांनी जिल्हा कृषीअधिकारी यांना मेल द्वारे मागणी केली आहे.