अमळनेर(रिपोर्ट)

रेशनिंग मार्फत शासनाने लॉकडाऊन काळात तीनमहिने सलग तांदूळ आणि दाळ मोफत वाटप करण्याचे नियोजन केले होते.पुरवठा विभागाकडून परिपूर्ण पुरवठा केलेला असून,परंतु काही रेशनिंग दुकानदारांनी दाळ वाटप मध्ये मोठा घोळ केला आहे.असे सर्वसामान्य जनतेकडून निदर्शनास येत आहे,काही रेशन दुकानदारांनी प्रामाणिक पणे तांदूळ आणि दाळ वाटप केली आहे. तर काही भामट्यांनी गरिबांची दाळ गिळून घेतली आहे. दक्षता समितीचा अध्यक्ष आमचा घरचाच आहे म्हणून आम्ही कोणालाही घाबरत नाही,आमची मनमानी अशीच राहील,आमचे वर पर्यंत हात आहेत.
        उच्चशिक्षित रेशन दुकानदार प्लस स्वतःला ऑलरेडी हुशार समजणारा ज्या गावाचे शंभरच्या वरती कार्डधारक असून त्यांना गावात रेशन वाटप न करता बाजूच्या गावाला एक ते दिड किलोमीटर अंतरावर रेशनिंग घेण्यासाठी त्या  लाभार्थ्यांना जावे लागत आहे.
   अशा या दंबगिरी करणाऱ्या रेशन दुकानदारांन वरती शासनाकडून कारवाई करण्यात यावी. अशी चर्चा जनतेमधून दबक्या आवाजात होतांना दिसून येत आहे.
    काही भामट्यांनी भामटेगिरी करून काळे हात केलेले आहेत. त्यांच्या तोंडाला लोक न्यूज काळे लावल्या शिवाय राहणार नाही.
       या सर्व बाबी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडे सर्वसामान्य जनता काही रेशन दुकानदारांच्या विरोधात गऱ्हाणे मांडणार आहेत असे समजते.