उभंरटी ता.साक्री येथे जलयुक्त शिवार अंतर्गत निष्कृष्ट दर्जाचे झालेली कामे
पेयजल योजना मध्ये काम न करता लाखो रुपयांचा निधी अफरातफर
अधिकारी व ठेकेदारांनी आपला खिसा भरला आणि स्वच्छग्राम योजनेअंतर्गत गावात झालेली स्वच्छालयाच्या कामात मोठी अफरातफर चा ठपका
श्री कैलास मोठाभाऊ भदाणे (प्रहार जनशक्ती पक्ष साक्री तालुका प्रमुख यांनी ठेवला होता. त्या अनुषंगाने
दिनांक 6 /3 /2020 वार शुक्रवार रोजी पंचायत समिती साक्री येते प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आमरण उपोषणास सकाळी ठिक अकरा वाजता उपोषणाला सुरुवात झाली होती.प्रहारच्या दणक्याने गटविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन एक तासाच्या आत मागण्या मान्य करून लेखी आश्वासन देण्यात आले व अमरण उपोषण मागे घेण्यात आले उपोषण करता श्री कैलास मोठाभाऊ भदाणे (प्रहार जनशक्ती पक्ष साक्री तालुका प्रमुख )व उंभरटी ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रहार चे काटवन प्रमुख राजेंद्र भदाणे महेंद्र सावंत गणेश सोनवणे शरद सोनवणे उमाकांत सोनवणे संदीप भदाणे हर्षल भदाणे उमेश सोनवणे अविनाश सोनवणे बाळू साळुंखे योगेश रामोळे आधी कार्यकर्ते उपस्थित होते