अमळनेर(प्रतिनिधी)
 कळमसरे गावाने मला सुरुवातीपासून सहकार्य केले आहे आणि येथील विकासासाठी मी नेहमीच प्राधान्य देईल.


आज दिनांक 7 रोजी आमदार अनिल भाईदास पाटील यांचा विविध संस्था व संघटनांकडून नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी ते बोलत होते.  
यावेळी विविध विकासकांमाचे लोकार्पण व नवीन विकास कामांचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले. गावातील दुर्गानगर भागातील दलित वस्ती अंतर्गत अकरा लाख रुपयांचे
 काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे तर,स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक व गेट बसविणे दहा लाख,इंदिरानगर वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण व पाण्याची टाकी बांधकाम एकूण सहा लाख रुपये, जिल्हा परिषदेच्या शाळेची खोली बांधकाम  आठ लाख बेचाळीस हजार,शाळेला संरक्षक भिंत चार लाख गावहाळ साठी दोन लाख, मंदिर परिसरातील रस्ता पाच लाख,पाडळसरे  रस्त्यालगत सहा लाख रुपयांचा दलित वस्ती सुधारणासाठी चौदावा वित्त आयोग व २५/१५ यातून निधी मंजुरी मिळाला असून याप्रसंगी विविध विकास कांमाचे लोकार्पण व कामाचा शुभारंभ करण्यात आला. तर जिल्हा परिषद निधीतून तांदळी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून शहापूर रस्ता राज्यमार्ग म्हणून लवकर करण्यात येईल

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक चौधरी होते.तर अनिल शिसोदे , शिवाजी पाटील ,विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील,सरपंच कल्पना पवार,माजी सरपंच प्रेमसिंग राजपूत,जी टी टाक,  प्रेमराज महाजन, ग्रामपंचायत सदस्य पिंटू राजपूत, अशोक चौधरी, मालतीबाई चौधरी यशोदाबाई निकम,भीमराव कुंभार,योगेंद्रसिंग राजपूत,झुलाल चौधरी,नथु चौधरी,बाबुलाल पाटील,किरणसिंग राजपूत,विकास संस्थेचे अद्यक्ष गुलाब चौधरी,सचिव सुधाकर पाटील , जगन्नाथ कुंभार,किसन सोनवणे, किसनसिंग राजपूत,कपिलेश्व मंदिर संस्थानचे सचिव मघन पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.आमदार अनिल पाटील यांचा यावेळी कळमसरे  ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी नागरी सत्कार केला. याप्रसंगी ,भागवत पाटील,अनिल शिसोदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय महाजन तर आभार दिनेशसिंग राजपूत यांनी मानले.