सोनगीर(प्रतिनिधी)

दि.07/03/2020 रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा निकुंभे च्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला गेला. महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटने तर्फे आपल्या शाळेतील उपक्रमशिल शिक्षका श्रीमती.जयश्री वसंतराव बोरसे व झाडी ता.अमळनेर येथील श्री.सुभाष श्रीराम पाटील (विद्यमान संचालक धंनदाई माता सो.प्र. डांगरी)यांची सुन आहेत.यांना ज्ञान ज्योती आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार हा साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर, डाएट प्राचार्या विद्या पाटील मॅडम आणि शिक्षणाधिकारी मनिष पवार सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानिमीत्ताने श्रीमती जयश्री बोरसे यांना पालक व शिक्षक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.