महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकार सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना मोफत हेल्मेटचे वाटप, तसेच पत्रकार संघाचे आयकार्ड वाटप व पत्रकार संघाच्या दिनदर्शिका 2020 चे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री माननीय नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात वाटप करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, आंबेगाव तालुक्याचे समीर पठाण,इंदापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महारुद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल भिसे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील तसेच महाराष्ट्रा राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर नाना गलांडे,पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे,कार्याध्यक्ष जावेद मुलानी,तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी,पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले,जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश मिसाळ, यांच्यासह तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तब्बल सत्तर सदस्य व प्रेस फोटोग्राफर उपस्थित होते.....