मुंबई दि. 15 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी; दीक्षाभूमी स्मारक समिती चे सचिव; ज्येष्ठ नेते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने ऐतिहासिक धम्मक्रांति चा साक्षीदार हरपला आहे.आशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत सदानंद फुलझेले यांना आदरांजली वाहिली आहे. उद्या सोमवारी दि. 16 मार्च रोजी नागपूर येथे दिवंगत सदानंद फुलझेले यांच्या अंत्यविधिस ना रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.
दिवंगत सदानंद फुलझेले हे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ अग्रणीय समाजसेवक होते. नागपुर चे ते माजी उपमहापौर होते. सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांति चे ते घटक होते साक्षीदार होते.14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर आयोजित केलेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी दिवंगत सदानंद फुलझेले यांनी पेलली. त्यांनी दीक्षाभूमी वरील स्मारक उभारण्यासाठी योगदान दिले. या स्मारक समिती चे सचिव म्हणून त्यांनी आदर्श काम केले. धम्म दीक्षा सोहळ्यापासून सुरू झालेल्या भारतातील धम्मक्रांति चे ते साक्षीदार ठरले. त्यांनी आयुष्य दिक्षाभूमी च्या संवर्धनासाठी वाहिले. सदानंद फुलझेले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.