अमळनेर(प्रतिनिधी)
घरात व घराबाहेर असलेले कचरा सर्वसामान्य व्यक्ती ,महिला हे गल्लीत ,अंगणात, किंवा उकिरड्यावर टाकतात.मात्र त्यापासून प्रदूषण,रोगराईला आमंत्रण मिळते.तोच कचरा ,प्लास्टिक इतर वस्तू रोजगाराच्या माध्यमातून संकलित करण्याचे काम महिला करतात.यातून जरी त्यांचा चरितार्थ चालत असला तरी त्या सर्वत्र पसरलेल्या कचरा गोळा करून खऱ्या अर्थाने स्वच्छतेचे काम करतात.म्हणूनच या महिलाच आरोग्यदूत म्हणून काम करतात.असे प्रतिपादन माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी कचरा वेचणाऱ्या महिलांना व पुरुषांना कोरोना आजाराच्या पाश्वभूमीवर मास्क वाटप केले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विक्रांत पाटील ,नगरसेवक श्याम पाटील,साखरलाल महाजन,महेश जोशी,जाकीर शेख,यतीन शेख,नविद शेख,फजल शेख,आदी उपस्थित होते.सर्वत्र कोरोना आजाराने भीतीचे वातावरण पसरले असून यावेळी कचरा वेचणाऱ्या महिलांना व पुरुषांना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी नियम पाळा कोरोना टाळा असा सल्ला देत शहरात याबाबत जनजागृती आणि आजाराबाबत विशेष मोहीम राबविली जात असल्याचे सांगत त्यांनी यावेळी तहसील कार्यालयात तलाठी व कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले.
शहरात जनजागृतीसाठी प्रत्येक कुटुंबामध्ये पत्रकाचे वाटप--
अमळनेर शहरातील प्रत्येक कुटुंबाला कोरोना आजाराविषयी स्वता सुरक्षित राहा आणि दुसऱ्याना ठेवा सुरक्षित ठेवा. या आशयाचे पंचवीस हजार पत्रके प्रत्येकी कुटुंबात वाटप करण्यात आले असल्याचेही यावेळी सांगितले. याच बरोबर याबाबत काही अपप्रचार सर्वत्र पसरविले जात असून स्वता काळजी घ्या,आणि आजाराला पिटाळून लावा .शहरात ठिक ठिकाणी जनजागृतीचे फलकावरही याबाबत माहिती प्रसारीत केली जात असल्याचे यावेळी सांगितले.