धुळे:शिरपुर तालुक्यातील अगदी छोटया कनगई गावातील देशात नावजलेला कब्बड्डी खेलाडू चुनीलाल पावरा हा प्रोड्यूसर सुभास घई डाइरेक्टर अमोल शेंडगे यांच्या विजेता या मराठी चित्रपटात झळकनार आहे यात सुबोध भावे,पूजा सावंत,सुशांत शेलार,माधव वझ,तन्वी किशोर,दीप्ती धोत्रे व देवेन्द्र हे सह कलाकार आहेत येत्या 12 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
कबड्डी या खेळातील चुनीलाल पावरा हा महान खेळाडू असून सध्या पुणे पाइरेट्स संघाचा हा कर्णधार आहे तसेच हरियाणा येथे झालेल्या स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरेने पंजाब संघ विरुद्ध विजय मिळवून दिला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.