पाडळसरे धरणाच्या दक्षिण तीरावरील कामाचे आमदारांच्या हस्ते पुनर्रसुरूवात

पाडळसरे धरण,उपसा योजना,निम मांजरोद पूल,कपिलेश्वर मंदिर संरक्षण भिंतसाठी तांत्रिक बाबीही लवकर पूर्ण होतील

प्रतिनिधी | अमळनेर 

तापी नदीवर साकारण्यात येत असलेल्या खान्देशातील सर्वात मोठा पाडळसरे प्रकल्पावर केंद्र सरकार कडून अन्याय झाला वेळीच केंद्राने मान्यता दिली असती तर प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश झाला असता , मात्र राज्य सरकार आता प्रथम प्राधान्य पाडळसरे धरणाला देत असून गेल्या तीन महिन्यांत पाडळसरे धरणासाठी अधीक्षक अभियंता, कार्यकरी संचालक पासून अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री यांचे कडे ८ वेळा बैठकी लावल्याचे फलित म्हणून पाडळसरे धरणाला सॉफ्ट लोण मधून १३८५ कोटी रुपये मिळतील तर बोहरे येथील साने गुरुजी उपसा सिंचन योजनेसाठी ११ कोटी ८६ लाख रुपयांची तरतूद येत्या अर्थसंकल्पात होईल त्यासोबत प्रस्तावित पाच उपसा सिंचन योजनांसाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे तर कपिलेश्वर मंदिरासाठी संरक्षण भिंत साठी २ कोटी ८६ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे असे आमदार अनिल पाटील यांनी पाडळसरे धरणाचे दक्षिण तीरावरील काँक्रीट कामाची पुनर्रसुरूवात प्रसंगी सांगितले
पाडळसरे धरणासाठी सध्या ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याने व पावसाळ्यात काम बंद असल्याने डाव्या बाजूच्या माती कामाची व साईड वालचे काँक्रीट कामाची सुरुवात करण्यासाठी आमदार अनिल पाटील हे धरणस्थळी सायंकाळी आले होते त्यांचे सोबत कार्यकारी अभियंता रजनी देशमुख, तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील, रामभाऊ संदानशिव,शिवाजी पाटील, पुनर्वसन समितीचे अध्यक्ष भागवत पाटील, वसंतराव पाटील हे उपस्थित होते
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की विशेष बाब म्हणून अमळनेर व शिरपूरला जोडणारा निम मांजरोद पूल मंजुरी साठी पाठपुरावा सुरु आहे, पाडळसरे धरणाचे एक दोन मीटर काम करण्यापेक्षा संपूर्ण धरणच पूर्ण करण्याचा मानस आहे त्यासाठी अभियंता, मंत्री पासून राज्य सरकारकडून पाडळसरेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे, तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतात पाडळसरे धरणाचे पाणी पोहचविणे हेच आपले ध्येय आहे त्यासाठी बलिदान देणारे शेतकरी व प्रकल्प बाधित व्यक्तींना तेवढ्याच जिव्हाळ्याने लक्ष केंद्रित करून भूसंपादन व पुनर्वसनाचा पाठपुरावा सुरू आहे त्यात डांगरीचा पुनर्वसनाचा प्रश्न जटिल झाला आहे तो पुनर्वसन मंत्री व जलसंपदा मंत्री यांनी गांभीर्याने घेतला आहे त्याबाबत विशेष करून मार्ग काढून त्यांच्या २० वर्षे पासूनच्या यातना सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असे ही आमदार पाटील यांनी सांगितले त्यासोबत बोहरे, कलाली या गावांचे पुनर्वसन साठी पाठपुरावा सुरू आहे , तालुक्यातील बंद अवस्थेतील ७ उपसा सिंचन योजना कमी खर्चात लवकर सुरू करण्यासाठी सर्वेक्षण खाजगी संस्थे कडून करण्यात येत आहे तर प्रस्तावित ५ योजना तयार करण्यास देशातील नामांकित खाजगी संस्था कामाला लागली आहे, 
तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे पाडळसरे धरणाच्या निधी व कामावर अधिक भर दिला आहे, यावेळी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष भागवत पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, डांगरीचे सरपंच अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती कार्यकारी अभियंता रजनी देशमुख, तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील यांनी नकाशे व डिजाईन दाखवून माहिती दिली , यावेळी उप कार्यकारी अभियंता डी सी पाटील,उपविभागीय अभियंता व्ही एस ठाकूर, व्ही पी वडगावकर आदींची उपस्थिती होती , तालुक्यातील शेतकरी विविध संस्थेचे पदाधिकारी व सरपंच यांची प्रमुख उपस्थिती होती