शिंदखेडा ( प्रतिनिधी) वर्षी तालुका शिंदखेडा येथील रहिवाशी डी आर पाटील उर्फ देवा बापू यांचे मोठे बंधू सुधाकर बोरसे यांचे ह्रुदय विकाराच्या झटक्याने पुणे येथे उपचार सुरू असताना निधन झाले सुधाकर बोरसे हे मूळचे वर्षी येथील रहिवासी एक अभ्यासू अभियंता म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शन दि १ मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्येंत धुळे येथील आनंद नगर नालंदा हायस्कुल जवळ देवपूर त्याच्या राहत्या बंगल्यावर ठेवण्यात येणार आहे त्या नंतर तेथून वर्षी येथील राहत्या घरुन अंत्ययात्रा निघून त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार दी 1 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता वर्षी येथे आयोजित करण्यात येणार आहे त्याच्या पच्यात पत्नी, दोन मुले,एक मुलगी, आई, एक भाऊ, असा परिवार असून ते वर्षी येथील बोरसे ब्रदर्सचे गव्हरमेन्ट कॉन्ट्रॅक्टर डी आर पाटील यांचे मोठे बंधू तर वर्षी जी प सदस्य सौ ज्योती देविदास बोरसे याचे ते जेठ होत.