खुशनुमा जीवन जीने की कला’ या विषयावर साधणार संवाद
अमळनेर ( प्रतिनिधी )
आपल्या मधूर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन करुन अनेकांना सकारात्मक जीवन जगण्याची दिशा देणाया जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे अमळनेर येथे ‘खुशनूमा जीवन जीने की कला’ या विषयावर ७ मार्च रोजी व्याख्यान स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल च्या प्रांगणात सायंकाळी ५ ते ७ या वेळात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रह्माकुमारीज् उत्तर महाराष्ट्र मीडिया प्रमुख डॉ. सोमनाथ वडनेरे व ब्रम्हकुमारी विद्या दीदी यांनी दिली,
कार्यक्रमाची माहिती पत्रकारांना देतांना त्यांनी सांगितले की, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जनसामान्यांना जीवन जगतांना येणाया अडचणी, छोट्या छोट्या गोष्टीतून नकारात्कता कशी वाढीस लागते व त्यावर काय उपाय करता येईल अशा जनसामान्यांच्या प्रश्नांना प्रभावशाली व अनुभवयुक्त मार्गदर्शन केले आहे. दीदींच्या सहज व चटकन आत्मसात करणाया उपायांनी अनेकांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलेली आहे. त्यांना नुकताच भारताच्या राष्ट्रपतीं महोदयांनी नारिशक्ति या पुरस्काराने सन्मानीत केले आहे. अशा प्रेरक व्यक्तिमत्वाच्या व्याख्यानाचा लाभ अमळनेर,पारोळा, चोपडा, धरणगाव, एरंडोल आणि परिसरातील नागरिकांना मिळणार असून याबाबत विविध समित्या स्थापन करून पूर्वतयारी झाली आहे ब्रह्माकुमारीज् अमळनेर सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी विद्यादीदींनी याप्रसंगी सांगितले की, ब्रह्माकुमारीज् जळगावच्या उपक्षेत्रिय निर्देशिका मिनाक्षीदीदींच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शिवानी दीदींचे व्याख्यान होत असून हे शहरवासीयांचे भाग्य आहे. दीदींचे व्याख्यानास सर्वांना विनामूल्य व खुला प्रवेश असून दिदींच्या व्याख्यानाची लोकप्रियता लक्षात घेता आसन व्यवस्थेच्या निश्चितीसाठी ब्रह्माकुमारीज्च्या सेवाकेंद्रात अथवा ब्रह्माकुमारीज प्रतिनिधींशी संपर्क साधावा. असे आवाहन अमळनेर केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी विद्यादीदी व डॉ सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे