अमळनेर प्रतिनिधी :-
तालुक्यातील देवगाव देवळी येथील सामाजिक कार्यकर्ते व साप्ताहिक अमळनेर भुषण चे उपसंपादक शिवाजी महाजन यांची महात्मा फुले बिग्रेडच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली ही निवड महात्मा फुले बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे,यांनी केली,शिवाजी महाजन यांची समाजकार्याची आवड पाहता सर्व समाज कार्यात पारदर्शकता, निर्भीडता व सामाजिक भावनेतून सर्व समाजाला सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक ,राजकीय कार्यामध्ये योगदान व मोठ्याप्रमाणात जनसंपर्क पाहून ही जबाबदारी महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे,शिवाजी महाजन यांची जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांचावर मित्रपरिवाराकडून मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.