अमळनेर: पांझरा नदीवर ब्रिजकम् केटिवेअर बंधारा बांधण्यात यावा त्यामुळे पाण्याचा व दळन वळनाचा प्रश्न सुटेल यासाठी मूडी परिसरातील महिला व ग्रामस्थांनी आमदार अनिल पाटिल यांना साकडे घातले आहे.
याबाबत माहिती अशी की,मूडी.कळंबु,बोदर्डे,लोण चारम व लोण सिम या परिसरातून पांझरा नदी वाहते या नदीपात्रात पावसाचे पाणी अडवण्यास कुठलीही उपाय योजना नाही परिणामी पानी वाया जाते त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतीला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो या साठी बोदर्डेगावालगत असलेल्या चोदिया येथे पांझरा नदिवर ब्रिजकम केटीवेअर बांधण्यात यावा अशी मागणी आमदार अनिल भाईदास पाटिल यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच या परिसरातून गुजरात राज्यात अनेक ग्रामस्थ ये जा करतात त्या साठी अमळनेर रेल्वे स्टेशन किंवा 5 किलोमीटर असलेले बेटावद रेल्वे स्टेशन असून त्यासाठी सोईचा मार्ग नाही या पांझरा नदीवर असा ब्रिजकम केटिवेअर बंधारा बांधल्यास दळन वळनाचा प्रश्न ही सुटेल असे निवेदन आमदार अनिल भाईदास पाटिल यांना देण्यात आले आहे.