लोक न्यूज

अमळनेर :--  आज ता. 24 रोजी अमळनेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय   येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विद्यालयाच्या  संचालिका विद्या दीदी, सुषमा दीदी, रंजू दीदी, आरती दीदी, वैष्णवी दीदी,  ऍड. तिलोत्तमा पाटील,  अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष चेतन राजपूत, माजी नगरसेवक विनोद कदम, इम्रान खाटीक, जितेंद्र देशमुख यांची  उपस्थिती होती.  
   यावेळी  राजयोगिनी दादी  प्रकाशमणी  यांच्या 18 व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनानिमित्ताने  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.याप्रसंगी राजयोगिनी दादी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करीत दीपप्रज्वलन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली.
  या रक्तदान शिबिरात 107 दात्यांनी रक्तदान करीत  सहभाग नोंदविला. खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, विद्या दीदी यांनी  *रक्तदान हेच जीवनदान* रक्तदान करणाऱ्यांचे मनोबल वाढविले.
    या शिबिरासाठी  हरचंद लांडगे, ऍड. तिलोत्तमा पाटील, जितेंद्र वाणी, प्रेमराज सूर्यवंशी, रमेश सैंदाणे, नरेंद्र महाजन,  रमेश शिसोदे, पवन लांडगे, प्रा. राजेंद्र मोराणकर, धनंजय सोनवणे, अजय भोळे, नरेंद्र पाटील, अनिल पाटील, निलेश चौधरी, अविनाश वाघ, यश माळी, रंगराव पाटील, योगेश पाटील नीलिमा महाजन, निलेश भांडारकर, गणेश चौधरी, प्रा. हिरालाल पाटील, संतोष पाटील यांचे शिबीर प्रसंगी सहकार्य लाभले.

चौकट :-  मुंबई ए. टी. एस. पोलीस पथकातील जितेंद्र सूर्यवंशी यांनी आतापर्यंत 17 वेळा रक्तदान केले होते. आज 18 व्या वेळी रक्तदान करीत आज  राजयोगिणी  प्रकाशमणी दादी यांचे 18 वे पुण्यतिथी निमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने जितेंद्र सूर्यवंशी  यांच्या बाबतीतही अनोखा योगायोग जुळून आला.
यावेळी जीवन ज्योती रक्त पेढीचे संतोष वाघ, सुनेला गावीत, योगेश महाले, अक्षय बारेला, गौरव पालीवाल यांनी रक्त गट तपासणी करीत 107 रक्तदात्यांचे रक्तसंकलन केले.