अमळनेर; अमळनेर तालुक्यातील भिलाली व एकलहरे येथील शिक्षण क्षेत्रातील नावाजलेले जिजाउ माध्यमिक विद्यालयात येथे वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात पार पडले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महिलावर्गाची
उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष ,सचिव,संचालक मंडळ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्यात आपला सहभाग नोंदविला तर तेजस रवींद्र पाटील,मिलिंद नवल कोळी,नितीन विकास पाटील,मयुरी लोटनसिंग गिरासे,पवित्रा
लोटनसिंग गिरासे या विद्यार्थ्यांनि आपले कलागुण सादर केले.