शिंदखेडा (प्रतिनिधी)
धुळे-सीएए व एन सी आर विरुद्ध सोसियल वातावरण तापत असून धुळे पोलिसांनी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून धुळे जिल्हा पोलिसांनी सोशल मिडिया मॉनिटरिंग सेल स्थापन केले आहे या द्वारे शिंदखेड़ा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दुर्गेश एम. तिवारी यांनी एक पत्रक काढून आवाहन केले आहे.
त्या योगे व्हाट्सअप,फेसबुक,इंस्टाग्राम व इतर सोसल मिडियावर अफवा पसरविणाऱ्या लोकांवर कड़क नजर ठेवली जाऊन कठोर कारवाइ करण्यात येइल तसेच अफवांवर भरोसा न ठेवता खात्री करुन घ्यावी असे आवाहनहि करण्यात आले आहे.