प्रतिनिधी अमळनेर
आते लोकेच कार्यकर्ता व्हयी ग्यात असा विश्वास शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे. तालुकाना स्वाभिमान कोणताबी परिस्थितीमा गहाण टाकावं नहीत त्यानासाठे आमीच नेता आणि आमीच कार्यकर्ता असा हुरूप कार्यकर्त्यांत निर्माण झाला आहे.मुडी मांडळ गटात रविवारी झालेल्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रि.पा.ई(कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्रपक्षांचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांचा प्रचार दौरा मुडी मांडळ जिल्हापरिषद गटात निवडणूक सुरू होती त्यावेळी उत्स्फूर्तपणे नागरिक कार्यकर्ते म्हणून कामाला लागले आहेत.
पाच वर्षांपूर्वी झालेली चूक जनतेच्या लक्षात आली असून दोनदा पराभव झालेल्या अनिल भाईदास पाटील यांना निवडुन आणण्यासाठी यंदा सामान्य जनतेने स्वतः कंबर कसल्याचे चित्र आहे. दोन वेळा पराभव याबरोबर पालिकेत झालेली मारहाण पुढे राजकारणात एकटे पडलेले अनिल भाईदास पाटील यामुळे आतापर्यंत त्यांच्यावर अन्याय झाल्याचे चित्र आहे आणि आता तोच अन्याय दूर करण्याचा निर्धार गावोगावी नागरिकांना घेतला आहे.
तालुक्यातील चार वर्षे दुष्काळी होते. या परिस्थितीत सिंचनासाठी ठोस असा प्रयत्न झाला नाही पीक विमा नाही कर्जमाफी नाही अशा कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही पाडळसरे धरणाला गती अथवा निधी मिळाला नाही. थेट मुख्यमंत्र्यांकडे संपर्क असूनही धरणाला निधी कसा मिळाला नाही हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.
पाडाळसरे धरण पांढरा हत्ती म्हणून गणना करणाऱ्यांना या तालुक्याची स्थितीच समजली नाही. गावोगावी नेत्यांच्या भरवश्यावर न अवलंबून राहता स्वतः मतदारच आता कामाला लागला आहे. आपसातील राजकारण संपवत यंदा स्थानिक हा मुद्दा डोळ्यासमोर मतदारांनी घेतला आहे.