अमळनेर येथील न्यू प्लॉट भागात एकता महिला मंडळाची स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत गल्लीतील सर्व बायकांनी मिळून मंडळाची स्थपना केलेली आहे संगीता डागा पुढे म्हणाल्याकी या मंडळाची मिटिंग प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला एकाच ठिकाणी न ठेवता प्रत्येक मेंबरच्या घरी होते जेणे करून गल्लीतील सर्व महिला एकत्र याव्यात व सगळयांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम आम्ही राबवत असतो.दांडिया रास न खेळता बुद्धीला चालना देणारा विविध उपक्रम आयोजित करत असतो,लहान मुलांसाठी निबंध, वक्तृत्व,चित्रकला,गायन त्याच प्रमाणे महिलांसाठी देखील विविध स्पर्धा घेत असतो,यात विजयी होणाऱ्या व सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बक्षीस देवून त्यांचा बहुमान केला जातो.
त्याच प्रमाणे गुणवंत विदयार्थ्यांचा देखील बहुमान केला जातो या सर्व उपक्रमांना आमच्या गल्लीतील पुरुषांचाही भक्कम पाठबळ असते. श्रीमती कंचनबाई ओस्तवाल,चंद्रकांताबाई डागा, चंन्द्रकालाबाई बागरेचा, कलावतीजी अग्रवाल,कार्यक्रम उपस्थित होते.