प्रतिनिधी अमळनेर

स्थानिक नेत्यांची कोंडी करत सुभेदारी करू पाहणाऱ्याना यावर्षी आता स्थानिक भूमीपुत्राची जोड मिळाली असून उपर्याना आता घरचा रस्ता दाखवत अमळनेर ची जनता सुभेदारी होऊ देणार नाही. आता घरचा रस्ता दाखविणार असल्याचे असे पत्रक भागवत पाटील यांनी दिले आहे. 

गेल्या पाच वर्षात अमळनेर तालुक्यातील वाहणाऱ्या तापी नदीवरील हा प्रकल्प ज्या गतीने काम मार्गी लागले असायला हवं त्या मार्गाने झाले नाही. त्याला 5 वर्षात यांनी आमदार असून कोणतेही दिवे लावले नाहीत.

त्यानंतर 2009 पासून पुन्हा आघाडी सरकारच्या काळात वेगाने सुरू झाले. तेव्हा अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांनी नको लाल दिवा नको पद म्हणत पाठिंबा दिला.आणि अजित पवारांच्या सुनील तटकरे यांच्या पाठीमागे राहून काम वेगात नेले. त्यावेळी शासनाविरुद्ध उपोषण अस्त्र बाळगत त्यांनी नागपूर अधिवेशन प्रसंगी उपोषण देखील केले आणि काम 5 मीटर नेले 
मात्र युती सरकार आले येथील अपक्ष आमदारांनी युती शासनाला सहयोगी सदस्य म्हणून पाठिंबा दिला मात्र त्यांनाही केवळ आश्वासन मिळत राहिले. त्यामुळे त्यांनीही गेल्या पाच वर्षात दिवे लावले नाही आता पुढे काय दिवे लावणार 2022 पर्यंत पाडळसरे मार्गी लागणार नाही. हे शासनचेच पत्रक आहे त्यामुळे भूलथापा आता बंद कराव्या 
येथील स्थानिक भाजप कार्यकर्त्या 30 वर्षांपासून सतत अभाविप ते भाजप असा प्रवास झालेल्या स्मिता वाघ यांना देखील विधानपरिषद सदस्यत्व मिळाले मात्र त्यांनाही वाट अडवत विविध ठिकाणी सतत त्रास देऊन अमळनेरात स्वतःची सुभेदारी बंधूंनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नेत्यांनी ही सुभेदारी मोडून काढण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला.

केवळ 20 ते 25 कोटींचा निधी मिळत राहिला तर प्रशासकीय मान्यता विविध मान्यता यापासून अधिक दूर गेला प्रशासकीय किंमत दिवसेंदिवस वाढत गेली. वेळ वाढत गेला. गाजरे मिळत राहिली आणि नको त्या कामात श्रेय घेण्यात स्वयंघोषित कार्यसम्राटांनी धन्यता मानली.

खासदार ए टी पाटील यांना तिकीट नाकारत स्मिता वाघ यांचे नाव जाहीर झाले. तेथेही प्रचंड विरोध बंधूंनी करून विरोध व घोळ निर्माण केला हे अमळनेरकर जनता विसरलेली नाही. आणि स्मिता वाघ यांचे तिकीट कापले गेले. यात अचानक उन्मेष पाटील यांचे पुढे नाव येऊन लीड घेऊन विजयी झाले. आज त्यांच्या जागी अमळनेरच्या स्मिता वाघ खासदार राहिल्या असत्या. हे अमळनेरकर जाणून आहे.

लोकसभा निवडणुकीत देखील भाजपचा चमत्कार पाहून स्थानिक संघर्ष समिती देखील थंडावली आंदोलनाचा देखील फरक पडत नाही म्हणून आंदोलन पुढे वेगळ्या दिशेने गेले. तेथेही पुढे राजकारणाचे वारे फिरले जिल्ह्यात राजकारण बदलले स्थानिक प्रश्न बदलले. प्रश्न सुटणार नाहीत हा एक प्रश्नच निर्माण झाला. बाहेरचा हस्तक्षेप मोडून काढत नाही तोपर्यंत हे असाच अन्याय सहन करत राहावा लागेल.

निवडणूक लागली आणि राजकीय गुंतागुंत अधिक वाढली. अनेक दिग्गजांची तिकिटे कापली गेली. त्यात पुन्हा स्मिता वाघ यांचे विधानसभेचे तिकीट नाकारले गेले. आणि स्थानिक जनतेची नस तडकली.

निवडणुकीत गाजणारा पाडळसरे मुद्दा पुढे मागे पडला. पक्षात साधं सदस्यदेखील नसलेल्या आमदारांना
या निवडणुकीत मात्र भाजपने तिकीट दिले. नंदुरबारात तिकिटावर भाजपच्या तिकिटावर लढून निवडून येण्याची लायकी नाही तेथे घाण करत आहेत भाजपाचे टिकीट स्थानिक व्यक्तीला न मिळाल्याने रोष निर्माण झाला आणि प्रचार भूमिपुत्र या दोन मुद्द्याभोवती फिरू लागला यात आता पक्ष भेदाभेद विसरून सर्व पक्षांचे कार्यकर्ते भूमिपुत्र प्रश्नांवर एक झाले त्यात कोण कोणाचा प्रचार करतोय हे मात्र दिसत नसले तरी या निवडणुकीत मूळ मुद्दा मतदारांनी बदलून टाकला. 

नेते आपापला स्वार्थ साधत फिरत असल्याचे चित्र असले तरी स्वार्थी नेत्यांना आपली जागा दाखवून भविष्यकाळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार जनतेने केला आहे राष्ट्रवादीची जाहीर सभा बरेच काही सांगून गेली आहे. गेल्या निवडणुकीत धनशक्तीची निवडणूक असा प्रचार झाला होता यंदा मात्र ही निवडणूक ना पैशांची हवेची तर स्थानिक माणसाला नाकारणाऱ्या पक्षाविरोधात सर्वसामान्य जनतेची निवडणूक म्हणून अंगावर घेतलेली आहे असे चित्र आहे. एकूण अमळनेरच्या मतदारांच्या मनात दडलंय आता फक्त भूमिपुत्र

भागवत पाटील
अमळनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख 
राष्ट्रवादी