पारोळा प्रतिनिधी -
पारोळा येथील गोविंद एकनाथ शिरोळे हे ज्या समाजात व सर्वजातिय लोकांमध्ये राहतात त्या लोकांसाठी , समाजासाठी काहीतरी करावे ही इच्छा प्रथमपासूनच मनात होती.गोविंद शिरोळे यांचे १० जणांचे संयुक्त कुटुंब आहे सुरुवातीला स्वतःचा फटाक्यांचा छोटा व्यवसाय सुरु केला होता . अनेक बरेवाईट अनुभव आले त्यातून खूप काही आबांना शिकायला मिळाले आणि व्यवसायात पारोळा नगरीत ठसा उमटवला.
अनुभवांचा उपयोग करून घेऊन व्यवसाय वाढवला आणि ईश्वरकृपेने त्यांचा सावित्री फायरवर्क्स सारखा नावाजलेला आणि वेलसेटल बिसनेस आता जवळपास ४५० प्लस लोकांनारोजगार पुरवीतआहेत आबा पुढे म्हणलेकी हा उदयोग माझे आणि माझ्या कुटुंबाचे पोट भरत नाही तर ४५० कुटुंबांना आधार देतो ही गोष्ट मनाला विशेष आनंद देते . पण समाजासाठी आपल्या माणसांसाठी तुम्हासर्वांसाठी काहीतरी करावे ही मनातली इच्छा मला स्वस्थ बसू देईना आणि म्हणूनच अनेकांच्या सहकार्याने मी राजकारणात प्रवेश केला होता आणि आपण मोठ्या मनाने माझी साथ देत सन १९९१ ला पारोळा नगरसेवक पदाची सूत्रे मला दिलीत . पुढे १९९५ ला नगराध्यक्ष पद मिळालं . १९९१ ते १९९५ संचालक , कृषी उत्पन्न बाजार समिती १९९६ ते२००१ नगरसेवक आणि १९९५ ते २००५ अर्बन को - ऑप बँक पारोळाचा संचालक म्हणून काम पाहिलं . या काळात गोविंदआबा शिरोळे यांनी केलेली विकास कामे...
१ . बोरीधरण विचखेडा बंधाऱ्या पर्यंतचे पाइपलाइनचे काम
२ . तामसवाडी धरणाच्या पाईपलाईन जोडण्याचे काम
३ . विचखेडा येथील साठवण बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम
४ . पाण्याच्या पाईपलाईनचे मुख्य प्रमाणात काम
५ . महाराष्ट्रात पारोळा सर्वप्रथम झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी ५ कोटी खर्च करून ५००० घरे निर्माणाची संकल्पना
६ . कचरालेटरबिन कुंड्या सुनियोजित पद्धतीने रचून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशंसा
७ . पारोळा शहरात नागरिकांना वर्षानुवर्षे त्रस्त करत असलेला पाण्याचा प्रश्नघेऊन नागरिक येतात , तेव्हा पाईपलाईन टाकून त्यांचे निवारण .
८ . नागरिकांना योग्य पद्धतीने आणि पुरवठा सुरू करून देण्याचे अनेक ठिकाणी काम
९ . २०१६ च्या वाढदिवसानिमित्त झालेले " भव्य आरोग्य शिबिर " अॅक्युपंक्चर शिबिर "
१० . वृक्षारोपनाचे कार्यक्रम
११ . अनेकठिकाणी मदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था
१२ . रक्तदान शिबिराचे आयोजना
वरील सर्व कामे पाहून गोविंद आबा शिरोळे यांना जनते कडून मोठा पाठींबा मतदार संघातून मिळतांना दिसून येत आहे.