भव्य रॅली काढून पोहोचले अनिल पाटलांच्या निवासस्थानी,सर्व स्तरातील युवकांचा समावेश

अमळनेर-  अमळनेर विधानसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांचा भूमिपुत्र हा मुद्दा जनतेला चांगलाच रुचत असून ही एक चळवळ समजून अनेक जण यात सहभागी होत 



आहे,पानखिडकी,पवन चौक,पाच पावली परिसर,कसाली ,माळीवाडा आणि भोईवाडा परिसरातील शेकडो नवयुवकांनी केवळ भूमिपुत्र या मुद्द्यावर एकसंघ होऊन महाआघाडीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.



मंगरूळ येथील दूध विक्रेते देखील यात सहभागी झाले होते,आणि केवळ युवकच नव्हे तर काही पुरुष मंडळींचा देखील यात समावेश होता.यात कोणी हातमजुरी करणारे,कोणी विक्रेते,व्यावसायिक,दूध विक्रेते,विद्यार्थी,आणि कोणी खाजगी नोकरदार होते,विविध परिसरातील असलेल्या या सर्व युवक व पुरुष मंडळींनी रात्रीच्या सुमारास एकत्र येत पायी अनिल पाटलांच्या निवासस्थानी पायी दौरा काढला रस्तावरून जाताना एवढा मोठा समुदाय अनेकांचे लक्ष वेधून घेत होता,आता फक्त भूमिपुत्र अश्या घोषणा देत ही सर्व मंडळी अनिल पाटलांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर अनिल पाटलांच्या गळ्यात हार टाकून पाठिंबा जाहीर करण्यात आला.केवळ आता केवळ भूमीपत्रालाच न्याय द्यावा असा ठाम निश्चय आम्ही केला असून यासाठी केवळ मतदानच नव्हे तर विजयासाठी प्रचंड मेहनत आम्ही घेणार आहोत,यात कोणताही स्वार्थ आमचा नसून भूमीपुत्राला न्याय देण्याची ही चळवळ असल्याने व या भूमीला विकाऊ म्हणून लागलेला कलंक पुसायचा असल्याने एक सामाजिक जवाबदारी समजून आम्ही यात सहभागी झालो आहोत,यापुढे कोण्याही बाहेरील व्यक्तीने आमच्या भूमीत राज्यकर्ते होण्याची नजर टाकू नये हाच संदेश आम्ही देणार आहोत,अशा भावना या मंडळींनी व्यक्त केल्या.तर अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की दोनदा पराभव झाल्यानंतरही केवळ या मंडळींना रवाना करण्यासाठी उमेदवारीचे धाडस मी केले असून यात उमेदवार मी एकटा नसून या भूमीतील प्रत्येकजण उमेदवार आहे,तुमच्यासारखी मंडळी मोठ्या उत्साहाने पाठीशी येत असल्याने माझा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे,बाहेरचे पार्सल नक्कीच रवाना होणार यात आता कुणालाही शंका नसल्याची भावना त्यांनी व्यक्त करून सर्वांचे विशेष आभार व्यक्त केले.
         सदर युवकांना संघटित करण्यासाठी सूरज परदेशी,स्वराज्य पान सेंटर चे किशोर बारी,चेतन देशमुख कुबेर मित्र परिवाराचे महेंद्र महाजन,प्रदिप पाटील,आदींचे सहकार्य लाभले.

कासार समाजाचाही पाठिंबा

        यावेळी कासार समाजाचे उमेश अंधारे यांनी अनिल पाटील यांची भेट घेऊन केवळ भूमीपुत्राला न्याय म्हणून अमळनेर येथील संपूर्ण कासार समाज अनिल पाटील यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले,यावेळी काही समाजबांधव देखील उपस्थित होते.