प्रतिनिधी अमळनेर
अमोल मिटकरी वंचित विस्थापित वर्गातील बहुजन वर्गाचे समाज कार्यकर्ते आहेत. ते माळी समाजाचे असून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर क्रांतिवीरांना अहिल्याबाई होळकर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे काम करणारे पुरोगामी चळवळीतील महाराष्ट्रातील धडाडीचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हास्यास्पद प्रकार असल्याचे प्रतिपादन प्रा अशोक पवार यांनी केले
स्वतःला मास्टरमाइंड म्हणून घेणारे डॉ रवींद्र चौधरी त्यांच्या जन्मभूमीत नंदुरबार मध्ये भाजपच्या तिकिटावर पराभूत झाले त्यांनी अमळनेर विधानसभा मतदार संघातील मतदारांकडून विजयाची अपेक्षा करू नये साने गुरुजींच्या कर्मभूमीत अठरापगड जातीचे लोक असताना जातीय विष जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अमळनेर मतदार संघातील जनता चौधरींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
विकास कशाला म्हणतात ते गुडघ्यात अक्कल असणाऱ्या माहीत नसते असा माझा अनुभव आहे विकास पुरुष नव्हे हे तर विकसित पुरुष आहेत कार्यसम्राट म्हणून घेणाऱ्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्तरकार्य जास्त झाले यांचे भान त्यांनी ठेवावे स्वतःला सम्राट म्हणण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते कारण मद्यसम्राट म्हणण्याची प्रथा आहे
मिटकरी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम विचारधारणा प्रभावी शब्दफेक खरी असल्याने चौधरी बंधूंना न पिताच चढली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू खचल्याने व पराभव समोर दिसत असल्याने त्यांनी कमरेचे सोडून डोक्याला बांधले म्हणून बेताल वक्तव्य करीत आहेत
पाडळसरे धरण बाबत बोलण्याचा नैतिक अधिकार चौधरी बंधूंना नाही धरणासाठी जो काही तुटपुंजा निधी आला तो देखील आमदार स्मिताताई वाघ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आला आहे धरणाच्या बाबतीत खोटी माहिती देऊन अंमळनेरकर स्वाभिमानी जनतेची दिशाभूल करू नका असे आवाहन प्राध्यापक पवार यांनी केले आहे.
अंमळनेर मतदारसंघाला कलंकित केल्याचे पाप लपवण्यासाठी तुम्ही भाजपचा आसरा घेतला आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे एकदा अपक्ष निवडून आलेल्या पुन्हा निवडून देत नाही हा अमळनेर मतदार संघाचा इतिहास व परंपरा आहे हे चौधरी बंधूंनी ध्यानात ठेवावे भूमिपुत्र अनिलदादा दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत होत नाही मैदानात लढताहेत अनिल दादांच्या पराभवाचा इतिहास बदलण्याची ताकद मतदारांमध्ये आहे यावेळी भूमिपुत्र विजयी होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे असेही प्रतिपादन अशोक पवार यांनी केले आहे.