ना भूमीपुत्राला,ना गोत्राला पसंती देणार फक्त शिरिषदादा सारख्या विकासपुत्राला

वंजारी येथील राम चैतन्य बापूंच्या आश्रमात आयोजित मेळाव्यात मान्यवरांचा सूर

अमळनेर( प्रतिनिध)

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भूमिपुत्र अथवा गोत्र या कोणत्याही निरर्थक बाबींना आम्ही थारा देणार नसून आमची पसंती फक्त आणि फक्त आ.शिरिषदादा सारख्या विकासापुत्रालाच राहील आणि तेच पुन्हा आमदार होतील अशी भावना पारोळा तालुक्यातील वंजारी येथे राम चैतन्य बापूंच्या आश्रमात आयोजित मेळाव्यात विविध गावांचे सरपंच आणि मान्यवरांनी व्यक्त केली.



         आ.शिरिषदादा मित्र परिवाराच्या वतीने अमळनेर मतदार संघात समाविष्ट असणाऱ्या पारोळा तालुक्यातील 40 गावांचा मेळावा वंजारी येथे आयोजित करण्यात आला होता.सदर ,मेळाव्यास आ.शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरीं यांची प्रमुख उपस्थिती होती.मेळाव्यास प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदायाची उपस्थिती होती.आमदारांच्या प्रचंड जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.आ.चौधरी यांनी मेळाव्यात संबोधित करताना आता काही संधीसाधू जातीपातीचे बीज उकरून काढून भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील परंतु आपल्याला भावना महत्वाच्या नसून विकास महत्वाचा आहे,आणि विकास काय असतो हे संपूर्ण जनतेने गेल्या पाच वर्षात उघड्या डोळ्यांनी अनुभवलं आहे,तरी भूलथापांना बळी न पडता विकासाचा सुरू झालेला रथ अधिक गतिमान करण्यासाठी खंबीर साथ द्या असे आवाहन आमदारांनी जनतेला केले.तर डॉ रविंद्र चौधरी यांनी विकासपुरुष ठरलेल्या शिरीष दादांच्या मागे खंबीर राहून हा मतदारसंघ आदर्श होण्यासाठी हातभार लावा असे आवाहन केले.


          शेतकी संघाचे माजी अध्यक्ष चतुर पाटील यांनी शिरीषदादांच्या विकासकामांमुळे मतदारसंघाचे नावलौकिक झाले आहे, संपूर्ण मतदारसंघात जी विकास कामे झालीत याचे श्रेय फक्त शिरीषदादांना असल्याने मतदार जात-पात, अथवा भूमिपुत्र पाहणार नाही फक्त विकास पुत्रालाच त्यांची पसंती राहील आणि एक लाखाच्या मताधिक्क्याने ते निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश साळुंखे यांनी मतदारसंघात सर्वाधिक विकास निधी आणून कामे पूर्णत्वास नेणारे विकास पुत्र फक्त शिरीषदादा असून यामुळे संपूर्ण मतदार संघ त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. मोहाडी सरपंच रामचंद्र पाटील यानीं आधीचे आमदार व आताचे आमदार शिरीष दादा यांचे दमदार विकास कामे सर्व गावांमध्ये सुरू आहे,यामुळे त्यांच्या रूपाने फक्त विकास पुत्रालाच मतदारांची पसंती राहील असा विश्वास व्यक्त केला.


             या प्रसंगी  सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदलाल पाटील, मा जिल्हा परिषद सदस्य डॉ प्रवीण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा संचालक बी एन पाटील, माजी प.स. सभापती गोकुळ चौधरी, श्रीराम चौधरी, नगरसेवक सलीम  शेख, आरिफ भाया, धनंजय महाजन, साखरलाल महाजन,किरण बागुल, सुनील भामरे, पंकज चौधरी, मोहाडी सरपंच रामचंद्र पाटील, भोलाने सरपंच चतुर पाटील, जीराळी सरपंच संभाजी पाटील, खेडीढोक सरपंच चांगदेव पाटील, रत्नापिंप्री सरपंच सुरेश पाटील, शेळावे सरपंच किरण पाटील, पिंपळकोठें सरपंच महेंद्र पाटील, आबापिंप्री सरपंच गुलाब महाजन, सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, भोकरबारी सरपंच भानुदास पाटील, बहादरपूर सरपंच चंद्रकांत जावरे, बोर्दडे सरपंच बाबुराव पाटील, करणखेडा सरपंच पंकज धनगर, हिंगोने सरपंच केदार राजपूत, माजी पस सदस्य विजय निकम, माजी सरपंच निबा चौधरी, राजेंद्र पाटील, मिलिंद मोरे, हरीचंद्र पाटील, वाय डी पाटील, हरी पाटील, सनी पाटील, विवेक पाटील, व परिसरातील सरपंच, विकासो चेअरमन, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.