आ.शिरीषदादा मित्र परिवाराने मुडी मांडळ गटात भव्य मेळावा घेऊन फुंकले प्रचाराचे रणशिंग,गर्दीने फुलले मैदान

अमळनेर( प्रतिनिधी )मातृभूमी असलेल्या  अमळनेर मतदारसंघात जातीपातीच्या गलिच्छ राजकारणाला मूठमाती देऊन नेहमीच विकासालाच प्राधान्य दिल्याने आज जनता आमच्या पाठीशी आहे,जे आजही या भूमीत जातीपातीचे राजकारण करत आहेत त्यांचे विचार त्यांना लखलाभ असून काहीही झालं तरी आम्ही विकासाच हे व्रत सोडणार नाही,आणि एखाद्या जातीचा आमदार होण्यापेक्षा विकास पुरुष होणे मी पसंत करेल अशी भावना आ.शिरीष चौधरींनी शिरसाळे येथे आयोजित भव्य मेळाव्यात व्यक्त केली.



        आ.शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन शिरसाळे येथे करून प्रचाराचे रणशिंग फुंकले,या मेळाव्यात  हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.मेळाव्यास संपुर्ण गटातून मोठा प्रतिसाद मिळाल्याने सभेचे मैदान गर्दीने हाऊसफुल्ल झाले होते.

डॉ रविंद्र चौधरींनी आपल्या भाषणात अमळनेर मतदारसंघ आदर्श करण्याचे आ शिरीष चौधरी यांचे ध्येय आहे.गेल्या पाच वर्षात विकासाची वाटचाल झालेली असली तरी अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या असून आता जनतेने पुन्हा आशीर्वाद दिल्यास आगामी काळात हा मतदारसंघ आदर्श करण्यास कुणीही रोखू शकणार नाही, यासाठी तुम्ही फक्त साथ सोडू नका असे विनम्र आवाहन त्यांनी जनतेला केले.

तसेच सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश साळुखे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की अमळनेर मतदार संघात मागच्या 35 वर्षात झालेली कामे आणि 5 वर्षात झालेली कामे यांची तूलना करून यांनी सर्व सामान्य गोर गरीब सर्व जाती धर्माला न्याय देण्याचा विळा उचलला आमदार शिरीष चौधरी हेच खरे विकास पुरुष असून कुणी स्थानिक आणि भूमिपुत्र मुद्दा घेऊन राजकारण करत असेल त्यांना जनतेने मतदानाच्या रूपाने सडेतोड उत्तर दयावे असे आवाहन केले , तसेच मुडी येथील रामचंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतात ही शिवरायांची भूमी असून सर्वाना न्याय देण्याचा प्रयत्न आ चौधरी यांनी केला गटातील अन्य पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना मुडी मांडळ गटात बंधारे, नाला खोलीकरण, पूल,ग्रामपंचायत रस्ते अशी विविध विकासकामे शिरीषदादांनी केली आहेत,आम्हीही जातीपातीला थारा देणारे मुळीच नसून विकासाचीच अपेक्षा आमची आहे,आणि ते करण्यास शिरिषदादा समर्थ असल्याने आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी भावना अनेक सरपंच,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मांडली.



          यावेळी असंख्य युवकांनी आ.शिरीषदादा मित्र परिवार आघाडीत प्रवेश केल्याने त्यांचा आ.चौधरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी  मारवड सरपंच उमेश साळूखे, नपा गटनेते प्रवीण पाठक, शिरसाळे सरपंच युवराज पाटील, उपसरपंच कैलास महाले, आर्डी सरपंच विजय वानखेडे, उपसरपंच किशोर पाटील, मांडळ सरपंच नारायण कोळी, उपसरपंच पांडुरंग भिल, सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, सारबेटे सरपंच मनोहर पाटील, मुडी सरपंच काशीनाथ माळी, बोर्दडे सरपंच संतोष चौधरी, जैतपिर सरपंच निलेश बागुल, वावडे सरपंच युवराज पाटील, वावडे लोण सिम सरपंच नाना पाटील, मा सरपंच एन आर पाटील, शिरसाळे मा सरपंच सुदाम चौधरी, सावखेडे मा सरपंच राजेंद्र पाटील, गलवाडे मा सरपंच राजेंद्र पाटील, लोण मा सरपंच समाधान पाटील, मुडी मा विकासो चेअरमन हेमंत पाटील, मा सभापती विजय पाटील, दिनेश माळी,रिंकू पाटील, उमेश पाटील, रमेश पाटील, रामचंद्र पाटील, नाना चौधरी, हिरामण पाटील, योगेश पाटील, हरी पाटील,विठ्ठल मिस्तरी, खंडेराव पाटील, संदीप पाटील,युवराज पाटील, प्रकाश पाटील, शरद पाटील,दिनेश राजपूत, संदीप मिस्तरी, साहेबराव पाटील, स्वप्नील पाटील, जितू पाटील, अशोक पाटील,प्रकाश पाटील, व सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.