वंचित बहुजन आघाडीच्या उद्या दि.29 सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
तालुका कमेटीने केले इच्छुक उमेदवारांना उपस्थितीचे आवाहन
अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदार संघातील ज्या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कोर कमेटीकडे ज्या उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. या उमेदवारांच्या मुलाखती वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहेत.
मुलाखती नंतर बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. हि बैठक आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल म्हणून या बैठकीत सर्व इच्छुक उमेदवारांनी २९ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी १२ वाजता सिध्दार्थ सोनवणे यांच्या घरी प्रबुद्ध कॉलोनी अमळनेर येथे उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे, कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पूनमचंद निकम, तालुका सचिव सुरेंद्रसिंग राजपूत, जिल्हा महासचिव आशिर्वाद ढीवरे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र माळी यांनी केले आहे