प्रेमआणि परोपकार हाच खरा धर्म
केंद्रीय प्रचारक श्री विनोद साहेब जी (जम्मू कश्मीर ) यांचे प्रतिपादन : अमळनेर येथे सत्संग मेळावा
अमळनेर प्रतिनिधी :- सद्गुरू हे शरीराचे नाव नसून ज्ञानाचे नाव आहे . सद्गुरूंचा जन्म ही होत नाही अथवा मृत्यू ही होत नाही तसेच सदगुरु नर अथवा नारी असत नाही . तर ईश्वराचे साकार रूप म्हणजे सद्गुरू आहे
या ईश्वराला जानन्या साठी पूर्ण सद्गुरु येणे गरजेचे आहे. तरच जीवनात चौरयाएनशी च्या फेरयातून मुक्ति मिळेल असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळाचे केंद्रीय प्रचारक डॉ विनोद साहिब जी (जम्मू कश्मीर) यानी केले .
आज मानव भौतिक साधनां मध्ये सुख शोधन्याचा प्रयत्न करीत आहे पन त्याला आत्मिक सूखाचा विसर पडला आहे हिन्दू, मुस्लिम ,सिख ,ईसाई ,जैन ,पारसी हे धर्म नसून ति एक विचार धारा आहे. आत्म्या ने परमात्म्याला जाणणे हा खरा धर्म आहे मानव करत असलेल्या व्यवसाया वरून जातींची निर्मिती झाली पण आपण माणूस म्हणून सर्व एक आहोत त्यामुळे माणसाने माणसाशी प्रेमाने वागायला हवे आहे परंतु आज चा मानवाला याचा विसर पडला आहे धर्म ,जाती ,संप्रदाय ,प्रांत ,वर्ण भाषा यांच्या नावाखाली मानव मानवा पासून दूर होत चालला आहे सर्व प्राणी मात्रांची निर्मिती करताना जर प्रभू परमात्म्याने भेदभाव केला नाही तर मानवाने आप आपसात भेदभाव करणे चुकीचे आहे प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा जेणेकरून प्रेमत्वाची भावना निर्माण होईल . या कलियुगात निरंकारी मिशन च्या माध्यमातून शांतता प्रस्थापित होण्यासाठी एकमेव सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज या निरंकार परम्यातम्याचे ज्ञान देतात व यानेच विश्वबंधुत्व संभव आहे असे त्यांनी सांगितले.
सदर प्रचार दौरा *आ. श्री. हिरालाल जी पाटील (झोनल ईंचार्ज धुळे झोन 36-बी)* यांच्या नेतृत्वाखाली 21 सप्टेंबर पासून 36ब झोन धुळे अंतर्गत सुरू होऊन नंदुरबार, शहादा ,दोंडाईचा, धुळे, पिंपळनेर, साक्री, शिरपूर हुन 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजता या दरम्यान संत निरंकारी सत्संग भवन चोपडा रोड सिंधी कॉलनी अमळनेर येथे पोहचला. त्या वेळी अमळनेर येथे भव्य स्वागत करण्यात आले. डॉ विनोद साहिब जी यांच्या सोबत हिमाचल प्रदेश हुन आ. गिताराम जी, आ. दिपक जी व तसेच अमळनेर चे मुखी श्रीचंदजी निरंकारी, शिरपूर चे मुखी गणेश जीपाटील, धरणगाव चे मुखी वसंतजी पाटील दोंडाईचा चे भिकाजी उपस्थित होते.
सत्संग सोहळा अतिशय आनंदी वातावरणात पार पडला अमळनेर येथे ग्रामीण व शहरी भागातील असंख्य भाविकांनी सत्संगाचा लाभ घेतला सत्संग सोहळा पार पाडण्यासाठी साठी अमळनेर चे संचालक, सेवादल ,प्रचारक आणि स्थानिक संतांनी मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम संपन्न झाल्यावर अमळनेर चे मुख्य श्रीचंद निरंकारी यांनी आभार मानले