ऐन निवडणुकीच्या तोंडावर शासनाच्या दारू वरील निर्बंध सैल सोडण्याच्या नवीन अध्यादेशाच्या विरोधात दारू बंदी महीला युवा मोर्चा तर्फे जिल्ह्याधिकार्यांना निवेदन.....

शिदखेडा (प्रतिनिधी )

आज दि. 30/9/2019रोजी 
ऐन निवडणुकीच्या तोंडावर दारू वरील कठोर प्रतिबंध घालण्याचे सोडून सरकारने मद्यपिंची आणि मद्यविक्रेत्यांची काळजी वाहत दारू वरील निर्बंध अधिक च सैल केले या सरकारच्या आडमुठ्या पणा चा निषेध नोंदवत संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महीला युवा मोर्चा च्या वतीने आज अपर जिल्हाधिकारी श्री संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

या अन्यायकारक अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी दारू बंदी महीला युवा मोर्चा च्या सौ गीतांजली कोळी, भटके विमुक्त ओबीसी महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष डॉ सुजाता आडे,यीन धुळे अध्यक्ष प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ता चेतन उपाध्याय, दारू बंदी मोर्चा शिंदखेडा अध्यक्ष आकाश कोळी, धुळे तालुका रविंद्र कोळी ललिता उपाध्याय, जयेश पाटील इ.उपस्थित होते.

सौ गीतांजली कोळी
संपुर्ण महाराष्ट्र दारूबंदी महीला युवा मोर्चा धुळे.