अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरीष चौधरी हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. तर भाजपाचे अनिल भाईदास पाटील यांचा दारुण पराभव झाला होता. त्यांना पराभवाचे शल्यबोचत राहिले तरी त्यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी आतून सुत जमवून घेत थेट त्यांनी आमदारांनी सुचवलेली कोट्यावधी रुपयांची कामे पाच वर्षात मतदार संघात केली आहे. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. तर शिरीष चौधऱींना भाजपाचे तिकिट मिळाले आहे. त्यामुळे त्यांनीच आमदार म्हणून सुचवलेली कामे अनिल पाटील यांनी करून चांगलीच माया जमवली आहे. तर आता त्यांचा थेट आमदारकीवर डोळा असल्याचे चित्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून आले.
अनिल भाईदास पाटील यांना भाजपाकडून लढून दोन्ही वेळेस पराभवाची धुळ चाखावी लागली होती. तर गेल्या पंचर्वाषिक निवडणुकीत अपक्ष शिरीष चौधरींमुळे त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. जे झाले ते झाले म्हणून आमदारांनी सुचित केलेल्या कामांची टेंडर आर.बी.पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. अमळनेर या नावाने भरली. त्यांना आमदार शिरीष चौधरी यांनीही कधीही चांगल्या वाईट कामांची तक्रार केली नाही असे आमदारांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पाच वर्ष अनिल भाईदास पाटील यांनी कोट्यावधी रुपयांची कामे अमळनेर मतदार संघात केली आहे. ही कामे सुरु असताना आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांना कधीही विरोध केला नाही. किंवा अनिल पाटील यांनी शिरीष चौधरींविषयी विरोधक म्हणून पाच वर्षात ब्रशब्द ही काढला नाही. त्यामुळे या दोघांची आतून सेटिंग असल्याचे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात होते.
आमदार चौधरींनी केले होते कामांचे उद्घघाटन
अनिल भाईदास पाटील यांनी केलेले एका कामाचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते झाले होते. हा कार्यक्रम दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच चर्चिला गेला होता. तर आता पुन्हा दोन्ही जण आमनेसामने निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे मतदार कोणाला कौल देतात, याकडे लक्ष लागून आहेत.
अशी केली कामे, अशी होती कामाची रक्कम…
सण २०१४-१९ मध्ये एसटीबीटी ते मांडळ मुडी भिलाली तांदळी निम रोडच्या कामाची किंमत ४७ लाख ९३ हजार ४८४ रुपये होती.या कामाची वर्क ऑर्डर २७ फेब्रुवारीला निघाली होती. त्याच दिवशी मांडळ मुडी भिलाली शापूर तांदळी रस्त्याचे नुतनीकर आणि रुंदीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली होती. त्याची किम ४३ लाख ३३ हजार ७६ रुपये होती. सावखेडा धरणगाव एरंडोल रोडची सुधारणा आणि रुंदीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर १८ जानेवारी २०१६ रोजी निघाली ते काम २ कोटी ५६ लाख ६७ हजार ३६० रुपयांचे होते. भोलाणे बहादरपूर भिलाली रत्नापिंप्री शेळावे रोडची सुधारणा आणि रुंदीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर१० फेब्रुवार२०१६ रोजी निघाली होती. ते काम १ कोटी ५२ लाख १३ हजा४७ रुपयांचे होते. मुसळी फाटा धरणगाव अमळनेर बेटावद रोडची सुधारणा आणि रुंदीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर ३ जानेवारी २०१७ रोजी निघाली होती.हे ३ कोटी ५२ लाख २३ हजार ८८ रुपयांचे होते. एसआर ते मेहरगाव धुळे अमळनेर चोपडा खारगाव रोडची वर्क ऑर्डर १३ मे २०१६ रोजी निघाली होती. त्याची किंमत १ कोटी ३० लाख ७२ हजार ६६० रुपये होती. धरणगाव राजवड पारोळा रोडची सुधारणाची वर्क ऑर्डर१७ जून २०१६ रोजी निघाली होती. त्याची किंमत १ कोटी ३९ लाख ९६ हजार ३२२ रुपये होती. राज्य मार्ग ते मेहरगाव धुळे अमळनेर रोडची क्रिटीकल पॅचच्या कामाची वर्क ऑर्डर ३ मे २०१६ रोजी निघाली होती. हे काम १४ लाख ४३ हजार ९८७ रुपयांचे होते. मेहेरगाव धुळे अमळनेर चोपडा खरगोन रस्ता रुंदी करणासह सुधारणा करण्याची वर्क ऑर्डर २२ जानेवारी २०१९ रोजी निघाली. त्याची किमत १३ कोटी २२ लाख ५ हजार ९८ रुपये होती. एरंडोल कल्याणी खु. पिंप्री खु. सोनवद बाभुळगाव रुंधाटी मठ गव्हाण जळोद दोधवद कलाली डांगरी बोहरा निम रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर ५ फेब्रवारी २०१९ रोजी निघाली होती. त्याची किंमत ४ कोटी ९४ लाख ८० हजार ३७ रुपये होती. राज्य मार्ग अमलोद मोड शाहदा संगवी हातेड जळोद अमळनेर पारोळा भडगाव रोडची वर्क ऑर्डर ११ मे २०१८ रोजी निघाली होती. तसचे २०१५ – १६ मध्ये ढेकू- अटाळे ते पिपळे रस्ता, २०१६-१७ मारवड खेडी वासरे ते शहापूर, मुडी ते कळंबा, २०१९-२० साठी मुडी ते कळंबा, मारवड ते भोरटेक, पातोंडा ते दापोरी, टाकरखेडा ते ते कंडारी या रस्त्यांचेही कामे घेतली आहे. त्याची किंमत ५६ लाख ९३ हजार २२१ रुपये होती. वावळे जवखेडा रोडची सुधारणा कामाची वर्क ऑर्डर ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निघाली होती. त्याची कामाची किंमत १ कोटी ७ लाख ९९ हजार ६४२ रुपये होती. २०१५-१६ मध्ये ढेकू- अटाळे ते पिपळे रस्त, २०१६-१७ मारवड खेडी वासरे ते शहापूर, मुडी ते कळंबा, २०१९-२० साठी मुडी ते कळंबा, मारवड ते भोरटेक, पातोंडा ते दापोरी, टाकरखेडा ते कंडारी या रस्त्यांचेही कामे घेतली आहे.